काँग्रेसचे अध्यक्षपद तब्बल ४५ वर्षे राखलेले नेहरु-गांधी घराणे आता इतरांना संधी देणार का?

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अध्यक्ष होण्याबाबत विचार करणार असल्याचे सांगितले आहे.
Priyanka, Rahul and Sonia Gandhi
Priyanka, Rahul and Sonia Gandhi File Photo

नवी दिल्ली : पुढच्या वर्षी २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२२ या दरम्यान काँग्रेसच्या (Congress) नवीन अध्यक्षांची निवडणूक होवू घातली आहे. शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काहीच वेळात पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर केल्या. यामुळे देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली ती म्हणजे, काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष नेमके कोण असणार? या पदावर कोणता नवा चेहरा येणार का? की पक्षाची धुरा पुन्हा एकदा नेहरु-गांधी कुटुंबीयांकडेच जाणार? हा प्रश्न विचारण्याचे आणखी एक कारण म्हणजे काँग्रेसच्या १३६ वर्षांच्या इतिहासात जवळपास ४५ वर्षे अध्यक्षपदी नेहरु-गांधी कुटुंबामधीलच सदस्य राहिला आहे.

Priyanka, Rahul and Sonia Gandhi
काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष? कार्यकारी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार

१८८५ ते १९१९ पर्यंत नेहरू-गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने काँग्रेसमध्ये फारसा हस्तक्षेप केला नव्हता. मात्र यानंतर १९१९ साली काँग्रेस पक्षाच्या अमृतसर अधिवेशनात मोतीलाल नेहरू यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. पुढे १९२८ मध्ये पुन्हा एकदा त्यांचीच अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याच्या पुढच्याच वर्षी, काँग्रेसची कमान मोतीलाल नेहरूंचे पुत्र पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आली. ते सलग दोन वर्षे या पदावर होते. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. मात्र त्यानंतर १९३६, १९३७ आणि स्वातंत्र्यानंतर १९५१ साली अध्यक्षपद पुन्हा एकदा जवाहरलाल नेहरुंकडेच आले. त्यावेळी ते सलग चार वर्षे अध्यक्ष होते.

Priyanka, Rahul and Sonia Gandhi
पुणे शहराचे अध्यक्ष कोण ठरविणार? काँग्रेस पक्ष की सोशल मिडियावरचा 'पोल'

त्यानंतर इंदिरा गांधींची (Indira Gandhi) या पदावर एन्ट्री झाली. १९६० साली काँग्रेसची कमान इंदिराजींच्या हातून नीलम संजीव रेड्डींकडे आली. पुढे १९७८ ते १९८३ पर्यंत पुन्हा इंदिरा गांधीच अध्यक्ष होत्या. राजीव गांधींनी १९८५ साली काँग्रेसची सुत्रे हाती घेतली. त्यांच्याकडे ६ वर्ष अध्यक्षपद होते. १९९८ मध्ये सोनिया गांधींची (Soniya Gandhi) अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यानंतर १९ वर्षे म्हणजे २०१७ पर्यंत त्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्या होत्या. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसची कमान त्यांचेच सुपुत्र राहुल गांधी यांच्याकडे सोपवली. मात्र, मधल्या काळात बऱ्याच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पराभव स्विकारावा लागल्यानंतर राहुल यांनी २०१९ मध्ये अध्यक्षपद सोडले. तेव्हापासून पुन्हा सोनिया गांधीच पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा आहेत.

पुन्हा राहुल गांधींकडे सुत्र येणार?

काल दिवसभर राहुल गांधींना (Rahul Gandhi) पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनवण्याबाबत जोरदार चर्चा झाली. यावर राहुल गांधी यांनी अध्यक्ष होण्याबाबत विचार करणार असल्याचे सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या मते, सर्व नेत्यांची इच्छा आहे की राहुल गांधीच पुन्हा अध्यक्ष व्हावेत. ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनीही म्हटले की, सर्व नेत्यांचे एकमत आहे की राहुल गांधींनीच पक्षाध्यक्ष व्हावे. ते तयार आहेत की नाही हे मात्र त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळेच आता या पदावर कोणता नवा चेहरा येणार का? की पक्षाची धुरा पुन्हा एकदा नेहरु-गांधी कुटुंबीयांकडेच जाणार? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com