पृथ्वीराज चव्हाणांना त्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी बोलूही दिले नाही!

या बैठकीला केवळ चार ते पाचच माजी मंत्री उपस्थित हेाते, उर्वरीत माजी मंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली.
 Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama

मुंबई : काँग्रेस (Congress) पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीच स्वीकारावे, असा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडून एक ओळीचा ठराव सोमवारी मांडण्यात आला. मात्र, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केल्याबद्दल सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे आभार मानणारा ठराव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना मांडू दिला नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीतच पृथ्वीराज चव्हाणांची कोंडी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीला केवळ चार ते पाचच माजी मंत्री उपस्थित हेाते, उर्वरीत माजी मंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार या दोघांना विनंती करूनही ते व्यासपीठावर गेले नाहीत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (Congress leaders did not even allow Prithviraj Chavan to speak in that meeting)

काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याचा आग्रह हायकमांकडे केला होता. त्या जी-२३ गटाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एक सदस्य आहेत. काँग्रेस प्रतिनिधी मंडळाची बैठक सुरू होण्याच्या अगोदर चव्हाण यांनी सोनिया गांधींच्या आभाराचा ठराव मांडणार असल्याचे स्पष्ट केले हेाते. अध्यक्षाची निवड पक्षांतर्गत निवडणुका घेऊन करणे हे लोकशाहीला पूरक असे पाऊल आहे. काँग्रेस नेत्यांच्या भावनांची दखल घेऊन सोनिया गांधी यांनी या निवडणुका घेण्यास परवानगी दिली, हे स्वागतार्ह आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे, असे वाटते. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेले अध्यक्ष म्हणून ते इतर विरोधी पक्षांची आघाडी प्रभावीपणे उभी करतील. काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली झालेली भाजपविरेाधातील आघाडीस लोकमान्यता मिळेल, असा आशावाद चव्हाण यांना पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचा होता.

 Prithviraj Chavan
उंटावरून विजयी मिरवणूक काढणाऱ्या सांगोल्याचा खासदार नाईक निंबाळकरांना विसर

तुमच्या भावना अत्यंत योग्य आहेत. पण, त्या मंचावर मांडू नका. त्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी आणि शीर्षस्थ नेत्यांना कळविण्यात येतील, असे आश्वासन चव्हाण यांना देण्यात आल्याचे तेथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यानंतर, पक्षाचे नेते न आल्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली. वाट बघूनही अमित देशमुख, सतेज पाटील, डॉ. नितीन राऊत, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर हे बैठकीला आलेच नाहीत, त्यामुळे कामकाज सुरू करण्यात आले. बैठकीला माजी मंत्र्यांपैकी केवळ सुनील केदार आणि विजय वडेट्टीवर हे दोघेच उपस्थित होते. तेही व्यासपीठावर गेले नाहीत. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी सांगितले की, आम्ही नाराज आहोत ही अफवा आहे. ठराव पारित करणे हेच उद्दिष्ट होते. त्यासाठी मंचावर जाणे आवश्यक नव्हते.

 Prithviraj Chavan
शिंदे गटात शह-कटशह : कोकाटे, ठोंगे, साठेंच्या निवडीनंतर सावंत गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

विश्वजित कदम शेवटच्या टप्प्यात आले

बैठकीला काँग्रेसमधील तरुण नेते ठरवून गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. माजी मंत्री विश्वजित कदम बैठकीच्या शेवटच्या टप्प्यात आले. प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे तर शेवटपर्यंत फिरकलेच नाहीत. अध्यक्षपदावर निवडून येणारी व्यक्ती प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य निवडणार असल्याचा ठराव पारित करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी बैठकीत ठराव मांडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in