काँग्रेस नेते विश्वजित कदम भाजपत प्रवेश करणार?; स्पष्टीकरणामुळे पुन्हा वाढला संभ्रम

आता विश्वजित कदम यांनीही भाजप प्रवेशावर भाष्य केले आहे.
Vishwajeet Kadam
Vishwajeet KadamSarkarnama

मुंबई : काँग्रेस (congress) पक्षातील एक गट फुटून भारतीय जनता पक्ष (BJP) जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू आहे. माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीमुळे त्या चर्चेला आणखीच जोर आला. चव्हाण यांच्याबरोबरच राज्यातील आणखी एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. तो मोठा नेता म्हणजे विश्वजित कदम (Vishwajeet Kadam). अशोक चव्हाण यांनी या अगोदरच भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता विश्वजित कदम यांनीही भाजप प्रवेशावर भाष्य केले आहे. (Congress leader Vishwajeet Kadam will join BJP?)

Vishwajeet Kadam
‘हाफकिन’वरून प्रश्न विचारताच आरोग्यमंत्री भडकले; ‘मी तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटतो का?’

विधान परिषद निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. ती मतदानाच्या वेळी आमदार फुटल्याने प्रकर्षाने जाणवलीही आहे. विशेष म्हणजे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्याबाबतचा जाबही काँग्रेस हायकमांडने विचारला होता. तसेच, विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे तब्बल १० हून अधिक आमदार अनुपस्थित होते. विशेष म्हणजे त्यात अशोक चव्हाण यांचा समावेश होता. ते विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उशिराने विधानभवनात दाखल झाले होते.

Vishwajeet Kadam
आम्हाला शिंदे गट-तमूक गट म्हणू नका; शिवसेना आमचीच : तानाजी सावंतांनी पुन्हा सुनावले

ती चर्चा खाली बसते न बसते तोच गणेशोत्सवात अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय धुराळा पुन्हा उडाला. चव्हाण तसेच फडणवीस या दोघांनीही योगायोगाने आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो. त्यावेळी आमच्या कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले हेाते. चव्हाण यांच्यानंतर विश्वजित कदमही भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Vishwajeet Kadam
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार?; या कारणामुळे शोधला पर्याय

दरम्यान, भाजप प्रवेशाबाबत विश्वजित कदम म्हणाले की, काँग्रेस पक्षातील कोणताही वरिष्ठ नेता भाजपमध्ये जाणार नाही, असे आमच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले. माजी महसूल मंत्री तथा पक्षाचे आमचे विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांबाबात ते बोलले आहेत. त्यामुळे भाजप प्रवेशाबाबत मी जादा बोलू इच्छित नाही. त्यामुळे कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असेही थेटपणे बोलले नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com