काँग्रेस नेते नितीन राऊत जखमी; शिंदे-फडणवीसांचा 'तो' निर्णय भोवला

काँग्रेसचे (Congress) नेते आणि राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे मंगळवारी तेलंगणात 'भारत जोडो यात्रे'दरम्यान जखमी झाले.
Nitin Raut News
Nitin Raut Newssarkarnama

Nitin Raut Nwes : काँग्रेसचे (Congress) नेते आणि राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे मंगळवारी तेलंगणात 'भारत जोडो यात्रे'दरम्यान जखमी झाले. राऊत यांच्या चेहऱ्याला मार लागला आहे. सध्या हैदराबादमधील एका रुग्णालयात राऊत यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती त्यांची मुलगी दीक्षा राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत म्हणाले की, मी भारत जोडो यात्रेत सहभागी होतो. आम्ही चार मिनार ओलांडल्यावर मी स्टेजकडे जात असताना राहुल गांधींचा ताफा आला, तेव्हा झालेल्या गर्दीमध्ये पोलिसांनी मला धक्काबुक्की केली आणि मी एका बॅरिकेटजवळ पडलो. माझ्या डोळ्याला इजा झाली, रक्तस्त्राव होऊ लागला आणि मला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी धक्काबुक्की केली, याचे खापर आता महाराष्ट्रातील शिंदे -फडणवीस सरकारवर फोडले जात आहे.

Nitin Raut News
Bharat Jodo यात्रेत शरद पवार सहभागी होणार; कॉंग्रेस नेत्याने स्पष्टच सांगितलं

काही दिवसांपूर्वीच शिंदे सरकारने संजय राऊत (Sanjay Raut), भास्कर जाधव, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील १७ नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. यामध्ये राऊत यांचाही समावेश होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा नव्हती.

एखाद्या नेत्याला एका राज्यात सुरक्षा असेल तर दुसऱ्या राज्यात ही सुरक्षा मिळते. राऊत यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने काढून घेतल्याने तेलंगणात त्यांना सुरक्षा दिली गेली नाही. त्यामुळे राऊत हे व्हीआयपी असल्याचे स्थानिक पोलिसांच्या लक्षात आले नाही. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी सामान्य माणूस समजून दिलेल्या धक्क्याने राऊत खाली पडले आणि जखमी झाले.

कदाचित त्यांच्या फोवती सुरक्षा असती तर ही दुर्घटना घडली नसती. त्यामुळे राऊत हे जखमी होण्यासाठी एकप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा आरोप काही काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. राऊत हैदराबादमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी होती. गर्दीवर नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने राऊत यांना जोरात ढकलले.

Nitin Raut News
Kedar : केदारांचा नकार होता, पण थेट अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी केला कॉल; अन् मग...

पोलीस अधिकाऱ्याने राऊत यांना ढकलले तेव्हा ते जमिनीवर पडले. त्यांचे डोके जमिनीवर आपटणार होते. त्यापासून वाचण्यासाठी राऊत यांनी डोक्याभोवती हात ठेवला. मात्र, यामध्ये त्यांच्या चेहऱ्याला मार लागला. त्यांच्या उजव्या डोळ्याला मार लागला असून डोळ्याच्या भुवईचा भाग कापला गेला. राऊत यांच्यावर सध्या हैदराबादच्या बासेरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in