काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील नेत्यांची झाडाझडती; ११ आमदारांची गैरहजेरी; तुम्ही काय करता?

नेमकं काय करता; फ्लोअर मॅनेजमेंट करता येत नाही का? : अनुपस्थितीबद्दल काँग्रेसश्रेष्ठींनी विचारला जाब
MLA
MLASarkarnama

मुंबई : विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावेळी काँग्रेसचे (Congress) तब्बल ११ आमदार अनुपस्थित होते. त्याची गंभीर दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतली असून पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (H.K. Patil) यांनी राज्यातील नेत्यांना फोन करून तीव्र नाराजी व्यक्ती केली. तसेच, ‘नेमकं काय करता, फ्लोअर मॅनेजमेंट करता येत नाही का?’, असा शब्दांत जाब विचारला आहे. (Congress High Command takes serious note of MLA's absence)

एकनाथ शिंदे सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी होती. शिंदे सरकारने आज विधानसभेत १६४ विरुद्ध ९९ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. या चाचणीच्या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह तब्बल ११ आमदार अनुपस्थित होते. त्याचा जाब काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी फोन करून राज्याला नेत्यांना विचारला आहे. काँग्रेस आमदारांच्या या नियोजनाबाबत तीव्र नाराजी काँग्रेस हायकमांडने व्यक्त केली आहे.

MLA
अशोक चव्हाणांच्या मनात चाललंय तरी काय? विश्वासदर्शक ठरावास समर्थकांसह गैरहजर!

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना फोन करून जाब विचारला आहे. आज विश्वासदर्शक ठरावावर मतदान असून पक्षाचे अकरा आमदार अनुपस्थित कसे राहिले. नेमकं काय करता, फ्लोअर मॅनेजमेंट करता येत नाही का, असा जाब त्यांनी राज्यातील नेत्यांना विचारला आहे. काँग्रेस आमदारांच्या या कृत्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

MLA
माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे ७ आमदार बहुमत चाचणीस गैरहजर; राष्ट्रवादीच्या दोघांची दांडी

काँग्रेसचे हे ११ आमदार अनुपस्थित होते

दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावेळी काँग्रेसचे अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, विजय वडेट्टीवार, झिशांत सिद्दीकी, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी, माधवराव जवळगावकर हे अकरा आमदार अनुपस्थित होते. त्याची काँग्रेसच्या हायकमांडकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

MLA
अजितदादांनी पैसे दिले नाहीत, असे आम्ही आयुष्यात कधीही म्हणणार नाही!

अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी सांगितले की, विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेस पक्षाचे आमदार आज उपस्थित राहिले नाहीत, याबाबत अचंबित व्हायची गरज नाही. आम्हाला फक्त दोन ते तीन मिनिटांचा उशीरा झाला. आम्ही लाॅबीत होतो, तेव्हा त्यांनी विधानसभेचे दरवाजा बंद केले. याचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्याचे गरज नाही. आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केले होतेच.संभ्रम निर्माण करू नका. आमच्यामध्ये कुणीही नाराज नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com