मुख्यमंत्र्यांची सहाव्या मजल्यावर सत्यनारायण पूजा? शिंदे म्हणाले जरा सांगा त्यांना...

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी पूजापाठ झाल्याचा आरोप
eknath shinde, devendra fadnavis
eknath shinde, devendra fadnavissarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची सहाव्या मजल्यावरील दालनात घेण्यापूर्वी पूजापाठ केल्याचा आरोप होत आहे. त्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका देखील करण्यात आली आहे. याबाबत शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. तुम्ही पूजा झालेली पाहिली आहे का, असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला. पत्रकारांनी नाही, असे उत्तर दिले. मग त्यांना जाऊन सांगा की, पूजा झालेली नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

eknath shinde, devendra fadnavis
३१ जुलैला अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रेवश करणार?

तक्रारीत काय म्हटले आहे.

शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी सायंकाळी राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि ७ जुलै २०२२ रोजी मंत्रालयातील आपल्या दालनात सत्यनारायणाची पूजा करत आपल्या कारभाराला सुरवात केली. मात्र हे राज्यघटनेच्या विरोधात असल्याचा आरोप करत ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली असून यावर पहिली सुनावणी येत्ये १ ऑगस्ट रोजी होणार आहे .

मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यघटनेला अनुसरून धर्मनिरपेक्षतेने देशाचा,राज्याचा संपूर्ण कारभार भारतीय राज्यघटनेनुसार चालवण्याची शपथ राज्यपालांच्या साक्षीने घेतली. मुख्यमंत्री पद हे संविधानिक आहे. त्यांनी कोणत्याही धर्माची, पंथाची बाजू न घेता, कोणत्याही धार्मिक वादाला अनुसरून काम करणार नाही, असे अपेक्षित आहे. असे असताना त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सुरू करताना दि. ७ जुलै २०२२ रोजी आपल्या दालनात सत्यनारायण पूजन केली . हे कृत्य भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध, अवमान, करणारे आहे. भारतीय राज्यघटनेने मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये धार्मिक पूजा करता येत नाही.

eknath shinde, devendra fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला : पाहा काही खास क्षणचित्रे...

या कृतीमुळे धर्मनिरेक्षतीत असलेल्या नागरिकांच्या भावना दुखावल्यात तसेच समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केले आहे. यामुळे भादंवि कलम ४०६ प्रमाणे एकनाथ शिंदे शिक्षेस पात्र आहेत. शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन आहे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे ही उल्लंघन केले आहे. तरी त्यांच्या विरोधात तक्रार क्रमांक १६७६/२०२२ प्रमाणे मे न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी ठाणे यांच्या न्यायालयात सुरोसे यांनी तक्रार केली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in