हितेंद्र ठाकूरांची भूमिका गुलदस्त्यात; मुख्यमंत्री शेवटच्या क्षणी पवारास्त्र वापरणार?

राजन विचारे आणि सुनील राऊत यांच्या शिष्टमंडळाचे ठाकूर किती ऐकतात, हेही पाहावे लागणार आहे.
हितेंद्र ठाकूरांची भूमिका गुलदस्त्यात; मुख्यमंत्री शेवटच्या क्षणी पवारास्त्र वापरणार?
Sharad Pawar-Hitendra Thakur-uddhav ThackeraySarkarnama

विरार : बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची रविवारी (ता. ५ जून) सायंकाळी शिवसेनेच्या (Shivsena) शिष्टमंडळाने भेट घेत राज्यसभा निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतरही ठाकूरांची भूमिका गुलदस्त्यात आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतात, याकडे शिवसेनेचे लक्ष असणार आहे. हितेंद्र ठाकूर हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शब्दाबाहेर जाणार नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शेवटच्या क्षणी या सर्व प्रक्रियेत पवारांना उत्तरवतील, असे राजकीय निरीक्षकांमधून अंदाज व्यक्त होत आहे. (Chief Minister Uddhav Thackeray will seek Sharad Pawar's help at last minute)

राज्यसभेसाठी एकेक मताची बेगमी ठरण्यासाठी भाजप आणि शिवसेना प्रयत्न करत आहेत. त्यांची भिस्त आता अपक्षांवर आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांवर दोन्ही पक्षांचा डोळा आहे. त्यामुळेच भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेताच रविवारी सायंकाळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार सुनील राऊत यांचे शिष्टमंडळ ठाकूरांच्या भेटीसाठी वसईत दाखल झाले होते. ठाकूर आणि शिवसेना नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे चार तास झाला. बैठकीनंतर मात्र निवडणुकीवर नव्ह तर कौटुंबीक चर्चा जास्त झाल्याचे ठाकूर, विचारे आणि राऊत यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीने आपले सारे पत्ते गुलदस्त्यात ठेवल्याने साऱ्यांच्या नजरा ठाकूरांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.

Sharad Pawar-Hitendra Thakur-uddhav Thackeray
राज्यसभा निवडणूक : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधीच फडणवीसांचा अपक्ष आमदारांना फोन!

र्चेनंतर सुनील राऊत आणि राजन विचारे यांनी सांगितले की, हितेंद्र ठाकूर आणि आमचे कौटुंबीक संबंध असल्याने आमच्या गप्पा रंगल्या होत्या. राज्यसभेच्या निवडणुकीबाबत जास्त वेळ चर्चा झाली नाही. आम्ही आम्हाला मते द्या, असे सांगण्यासाठी आलो होतो. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, सर्वच पक्षात माझे मित्र असल्याने सर्वजण भेटायला येत असतात. राज्यसभेची निवडणूक असल्याने मतांसाठी सारेजण येत असतात. काल धनंजय महाडिक आले होते, तर आज संजय पवार यांच्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ आले होते. राज्यसभेसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा, ते योग्यवेळी जाहीर करण्यात येईल.

Sharad Pawar-Hitendra Thakur-uddhav Thackeray
मोठी घडामोड : धनंजय महाडिकांनी घेतली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट!

शिवसेनेनेबाबत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या मनात अडी असल्याने समर्थनाच्या निर्णयाबाबत विचार करून हितेंद्र ठाकूर यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. यातही राजन विचारे आणि सुनील राऊत यांच्या शिष्टमंडळाचे ठाकूर किती ऐकतात, हेही पाहावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यात किती लक्ष घालतात, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, पवार यांच्या शब्दाबाहेर हितेंद्र ठाकूर जाणार नसल्याने शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री ठाकरे सगळ्या प्रक्रियेत शरद पवार यांना उतरवतील, असे मत राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in