Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत शिंदे सकारात्मक; पण राज्यसरकारमध्येच...

Pension News : जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्य सरकारमध्ये दोन गट असल्याची चर्चा
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Old Pension Scheme News : शासकीय कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनावर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर पुन्हा एकाद जुन्या पेन्शन योजनेची चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे. मात्र, आता जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्य सरकामध्ये दोन गट असल्याचे दिसून येत आहे.

हिवाळी अधिवेशात जुनी पेन्शन योजना देणे शक्य नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर दोन दिवसापूर्वी नागपूरमध्ये बोलताना त्यांनी जुनी पेन्शन आम्हीच देऊ शकतो, असे सांगितले होते. २००५ मध्ये पेन्शन योजना बंद झाली. राज्याचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर एक लाख १० हजार कोटींचा बोझा पडतो. यातून राज्य दिवाळखोरीत निघेल, असे फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Pune : कसबा मतदारसंघ : अजित पवारांच्या भीतीमुळे कॉंग्रेसकडून अवघ्या चोवीस तासात इच्छुकांची यादी जाहीर

मात्र, आता महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक भूमिका दाखवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत भाष्य केलं असून आमचे सरकार शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक असल्याचे ते म्हणाले आहेत.

शिंदे म्हणाले, ''महाराष्ट्र राज्याचा शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेबाबत अभ्यास करत आहे. याबाबत आमचे सरकार देखील सकारात्मक आहे''. त्यामुळे शिंदे यांच्या या भाष्यावरुन राज्यातील शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना येणाऱ्या काळात गोड बातमी मिळू शकते. तसेच ''इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के आरक्षणाबाबत राज्य सरकार हे सकारात्मक आहे. त्याचबरोबर शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजनेविषयी शिक्षण विभाग अभ्यास करत आहे. त्यामुळे शिक्षकांना देखील जुनी पेन्शन देण्याचा विचार आमचा आहे'', असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

यामुळे आता राज्य सरकारमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. भाजप जुन्या पेन्शनच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. तर मुख्यमंत्री शिंदे जुन्या पेन्शन योजने बाबात बोलत आहेत. हिवाळी अधिवेशनावर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर शिंदे यांनी दोन घोषणा केल्या होत्या. त्यामुळे ते याबाबत सकारात्मक असल्याचे दिसत आहे. यावरुन आता राज्य सरकारमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar : शिंदे गटातील आमदारांच्या 'वाय प्लस' सुरक्षेला किती खर्च? अजितदादांनी आकडाच सांगितला...

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी मयत कर्माचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय दिला होता. फमिली पेन्शन आणि ग्रॅज्यूटी देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. फॅमिली पेन्शन म्हणजे, एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाले तर त्यांच्या पत्नीला पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे शिंदे यांनी कर्मचाऱ्यांची एक मागणी पूर्ण केली, आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची मोठी मागणी जुनी पेन्शनच आहे, ती कधी पूर्ण होणार असा प्रश्नच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com