मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला; कॅन्सरशी लढणाऱ्या यामिनी जाधवांना हॉस्पिटलमध्ये जाऊन धीर दिला!

शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव या कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 Eknath Shinde- MLA Yamini Jadhav
Eknath Shinde- MLA Yamini JadhavSarkarnama

मुंबई : बंडाच्या वेळी समर्थपणे साथ देणाऱ्या मुंबईतील शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांची रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट घेतली. कॅन्सरचा सामना करणाऱ्या जाधव यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांशी चर्चा करत त्यांना काही सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. बंडाच्या वेळी गुवाहाटीत आणि महाराष्ट्रात आल्यानंतरही बंडखोर ४० आमदारांच्या पाठीशी मी सुख-दुःखाच्या कोणत्याही परिस्थितीत उभा राहणार आहे, असा शब्द दिला. तो शब्द पाळत मुख्यमंत्री शिंदे यांनी यामिनी जाधव यांना रुग्णालयात जाऊन धीर दिला. (Chief Minister Eknath Shinde went to the hospital and questioned MLA Yamini Jadhav)

शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव या कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यामिनी जाधव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत चर्चा करून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत माहिती घेतली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना काही सूचनाही केल्या. या प्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेना नेते आणि यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हेदेखील उपस्थित होते.

 Eknath Shinde- MLA Yamini Jadhav
Dussehra Melava :सोलापुरातून दोन हजार शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार

कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करणाऱ्या जाधव कुटुंबीयांना धीरही दिला. शिंदे म्हणाले की, सकारात्मक विचार बाळगून या दुर्धर आजाराशी सामना करावा, अशी विनंती यामिनी जाधव यांना केली. आई दुर्गेश्वरीच्या आशीर्वादाने आपण लवकरच पूर्णपणे बऱ्या होऊन पुन्हा एकदा संपूर्ण क्षमतेने कार्यरत व्हाल, असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला.

 Eknath Shinde- MLA Yamini Jadhav
मुख्यमंत्र्यांना साफसफाई करायची की हाथसफाई? : नीलम गोऱ्हेंचा शिंदेंना टोला

यशवंत जाधव हे मातोश्रीच्या अत्यंत निकटचे समर्थक समजले जात होते. गेली अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या तिजोरीची चावी जाधव यांच्या ताब्यात होती. शिवाय जाधव यांच्या पत्नी यामिनी या आमदार होत्या. मात्र, बंडाच्या वेळी जाधव कुटुंबीयाने एकनाथ शिंदे यांची साथ दिल्याने ठाकरे कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.

 Eknath Shinde- MLA Yamini Jadhav
रक्ताची नाती कधीही संपत नसतात; पण... : पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर

यामिनी जाधव यांनी गुवाहाटीवरून बोलताना आपण गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी लढत आहोत. मात्र, आपली साधी विचारपूसही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबीयांनी केली नव्हती, अशी खंत बोलून दाखवली होती. तसेच, कोरोना काळातही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ईडीची नोटीस आल्यानंतरसुद्धा आम्हाला कोणी विचारले नव्हते, असेही त्यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com