पवारांचे निमंत्रण नाकारणारा ब्राम्हण महासंघ चंद्रकांतदादांच्या बैठकीस हजेरी लावणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील काही दिवसांपूर्वी राज्यातील ब्राह्मण संघटना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र, ब्राह्मण महासंघाने शरद पवार यांचं हे निमंत्रण धुडकावलं होतं.
पवारांचे निमंत्रण नाकारणारा ब्राम्हण महासंघ चंद्रकांतदादांच्या बैठकीस हजेरी लावणार

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ब्राह्मण महासंघाला (Brahmin Federation) चर्चेचं निमंत्रण दिले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad Pawar) यांनी दिलेलं चहापानाचं निमंत्रण नाकारणाऱ्या ब्राह्मण महासंघाने भाजपचे कोथरुडचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. ही बैठक पाटील यांच्या पुण्यातील कोथरुड येथील निवास स्थानी उद्या (ता. १९ ऑगस्ट) सकाळी होणार आहे. मात्र, या भेटीत कशावर चर्चा होणार, हे अद्याप समजू शकलेले नाही. (Chandrakant Patil's invitation to Brahmin Federation for discussion)

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चेसाठी ब्राह्मण महासंघाला चहापानाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी ब्राह्मण महासंघाने पवारांचे ते निमंत्रण नाकारले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. त्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण महासंघाला चर्चेचे निमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे ते निमंत्रण महासंघाने स्वीकारली आहे.

पवारांचे निमंत्रण नाकारणारा ब्राम्हण महासंघ चंद्रकांतदादांच्या बैठकीस हजेरी लावणार
ठाकरेंना आणखी एक धक्का : आमदार राजन साळवी साथ सोडणार; शिंदे गटात प्रवेशाचे संकेत!

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी उद्या (ता. १९ ऑगस्ट) सकाळी ब्राह्मण महासंघ आणि पाटील यांच्यामध्ये ही बैठक पार पडणार आहे. मात्र, या बैठकीचा अजेंडा समजू शकलेला नाही. त्यामध्ये काय चर्चा होते. याकडे पुणेकरांचे डोळे असणार आहेत.

पवारांचे निमंत्रण नाकारणारा ब्राम्हण महासंघ चंद्रकांतदादांच्या बैठकीस हजेरी लावणार
फडणवीसांना पुण्यातून दिल्लीला पाठवा : ब्राह्मण महासंघाची सर्वांत आधी मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील काही दिवसांपूर्वी राज्यातील ब्राह्मण संघटना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र, ब्राह्मण महासंघाने शरद पवार यांचं हे निमंत्रण धुडकावलं होतं. मात्र त्याच ब्राह्मण महासंघाने पाटील यांचे भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. पवारांसोबत काही संघटनांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. त्यावेळी समाजाच्या काही मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन पवारांनी दिले होते. त्या मागण्या हे सरकार पूर्ण करणार का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होते.

पवारांचे निमंत्रण नाकारणारा ब्राम्हण महासंघ चंद्रकांतदादांच्या बैठकीस हजेरी लावणार
‘रश्मी शुक्लांची फडणवीस भेट म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय’

दरम्यान, ब्राह्मण महासंघ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या दोघांच्या भेटीत काय चर्चा होणार, याची उत्सुकता पुणेकरांसोबत ब्राह्मण समाजाला लागली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com