सिद्धार्थ शिरोळेंचा तरुण खासदार उल्लेख आणि चंद्रकांतदादा म्हणाले, ‘मी ते मागे घेतो...’

आमच्याकडे फार मोठी रांग आहे.
siddharth shirole-chandrakant patil
siddharth shirole-chandrakant patilsarkarnama

पुणे : पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतच्या बैठकीची माहिती देताना बोलण्याच्या ओघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांचा उल्लेख ‘आमचे तरुण खासदार’ असा केला. त्यानंतर उपस्थितींमध्ये कुजबूज सुरू झाली. पत्रकारांनी ती चूक लक्षात आणून देताच चंद्रकांतदादांनी ‘मी ते चुकून म्हटलेले मागे घेतो,’ असे सांगून तोंड फुटू पाहणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिला. (Chandrakant Patil referred to Siddharth Shirole as a young MP)

पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या जागेला संरक्षण विभागाकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर पुण्यात आज (ता. ८ जानेवारी) त्यासंदर्भाने बैठक घेण्यात आली. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी शिरोळेंचा उल्लेख वरीलप्रमाणे केला. आमदार शिरोळे यांच्या संदर्भात झालेल्या उल्लेखाबाबत पत्रकारांनी त्यांना शिरोळे हे भविष्यातील खासदार आहेत का, असा प्रश्न विचारला. त्यावर आमदार पाटील म्हणाले की, भविष्यातील अनेक वर्षे सिद्धार्थ शिरोळे हे खासदार होण्याची शक्यता नाही. कारण, आमच्याकडे फार मोठी रांग आहे. मी चुकून म्हटलेले मागे घेतो आणि तरुण आमदार असे म्हटतो. भाजप हा असा पक्ष आहे की एक झाल्यावर दुसरा, दुसरा झाल्यावर तिसरा अशी एक रांग तयार असते. बाकीच्या ठिकाणी प्रॉब्लेमच असतो, की आता कोण. रांगेत राहणारे हेल्दी मूडमध्ये असतात, असा विनोदही त्यांनी शेवटी केला.

siddharth shirole-chandrakant patil
सुप्रिया सुळे, गिरीश बापट घेणार ज्योतिरादित्य शिंदेंची भेट

उत्तर प्रदेश, गोव्यात शिवसेना निवडणूक लढवणार आहे, त्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, दरवेळी अनामत घालवण्यासाठी शिवसेनेला पैसे मिळतात. त्यामुळे ते आपले डिपॉझिट घालवतात, असा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केला. निवडणूक आयोगाने जाहीर झालेल्या तारखा ह्या भाजपला सोयीच्या आहेत, असा आरोप होत आहे, त्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, विरोधी पक्षांना अनुकूल झाले की ते चांगले, असे म्हटले जाते. आता जाहीर झालेल्या तारखा विरोधकांना गैरसोयीच्या असतील. त्या का आहेत, हे मात्र मला माहित नाही.

siddharth shirole-chandrakant patil
आमदार महेश लांडगेंचा डाव अमोल कोल्हेंनी त्यांच्यावरच उलटवला!

शिरोळेंवर येणार मोठी जबाबदारी!

संरक्षण विभागातील तज्ज्ञ, दिल्लीतील निवृत एअर मार्शल गोखले यांनीही याप्रश्नासंदर्भात वेळ द्यावा, यासाठी त्यांना विनंती करण्यात येणार आहे. आमचे तरुण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मी आग्रह धरणार आहे की, विमानतळाबाबत धावपळ करणारा कोणीतरी माणूस लागतो. कारण समाजालाही याबाबतची माहिती मिळणे आवश्यक असते, असे सांगून विमानतळाबाबत सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर भाजपकडून जबाबदारी देण्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com