करुणा शर्मा तर परळीतून लढणार होत्या; कोल्हापुरातून लढणार हे मोठे आश्चर्यच!

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी जाहीर केले आहे.
Chandrakant Patil-Karuna Sharma-Munde
Chandrakant Patil-Karuna Sharma-MundeSarkarnama

मुंबई : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे (Karuna munde) यांनी जाहीर केले आहे. त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आश्चर्य व्यक्त करत त्या तर परळीमधून लढणार होत्या. पण, करुणा शर्मा ह्या कोल्हापूरमधून लढणार आहेत, याबाबतची मला माहिती नाही, असे सांगितले. (Chandrakant Patil is surprised about Karuna Sharma-Munde contesting from north Kolhapur Byelection)

कोल्हापूरमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले की, करुणा शर्मा-मुंडे या कोल्हापूर उत्तरमधून लढणार आहेत, हे मोठे आश्चर्य आहे. त्या तर परळीमधून लढणार होत्या. पण, कोल्हापूरमधून निवडणूक लढणार आहेत, हे मात्र मला माहिती नाही.

Chandrakant Patil-Karuna Sharma-Munde
काँग्रेसकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आला होता : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

सरकारवर हल्ला करताना आम्ही तो टप्पाटप्याने करतो. वीजबिलबाबत आम्ही तसेच केले. सुरुवातीला सरकार मानायला तयार नव्हते. मात्र, अधिवेशनात त्यांना वीजबिल वसुलीसाठी कनेक्शन तोडणीची मोहिम थांबवण्याची घोषणा करावी लागली. तसेच नवाब मलिक यांच्याबाबत आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी मलिक यांच्याकडील खाती काढायलाही तयार नव्हती. त्यांनी गुरुवारी ती खाती काढली. एखाद्या सरकारी अधिकाऱ्यास अटक झाल्यास त्याला २४ तासांत निलंबित करावे लागते. त्याचपद्धतीने मलिक यांना अटक झाल्याने त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा. सुरुवातीला नकार देणाऱ्या राष्ट्रवादीने आता त्यांच्याकडील खाती काढून घेतली आहेत. आता त्यांना मंत्रीपदही सोडावे लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil-Karuna Sharma-Munde
कोल्हापूर उत्तरसाठी पक्षश्रेष्ठींना दोन नावे कळवली; पण आम्ही या नावावर आग्रही!

उमेदवारीसाठी दोन नावे केंद्रीय समितीला पाठवली

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपने दोन नावे पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्या नावाचा समावेश आहे. कदम यांच्या नावावर आमचे एकमत झाल्याचे आम्ही दिल्लीला कळविले आहे. पण अंतिम निर्णय अजून झालेला नाही. आज (ता. १८ मार्च) रात्री होणाऱ्या पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीनंतर अधिकृत उमेदवाराची घोषणा होईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Chandrakant Patil-Karuna Sharma-Munde
आमदारांचे महत्व अजित पवारांना नाही कळणार नाही तर कोणाला?... म्हणूनच घेतलाय हा निर्णय

काँग्रेसचा बिनविरोधचा प्रस्ताव

चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूल लागली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षासाठी विशेषतः पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न चालवले होते. त्यासाठी त्यांनी आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा विनंतीवजा प्रस्ताव महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस पक्षाकडून आमच्याकडे आला होता. मात्र, आम्ही ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. ही निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थिती लढवणार आहोत, असे त्यांना सांगितले, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला.

Chandrakant Patil-Karuna Sharma-Munde
कोल्हापूरची पोटनिवडणूक पंचरंगी; करूणा शर्मा, अभिजित बिचुकलेही रिंगणात

पंढरपूर पॅटर्न राबविणार

ते म्हणाले की, पंढरपूर पॅटर्नमध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचविण्याचे काम केले होते. राज्यातील भाजपचे बहुतांशी नेते पंधरा-पंधरा दिवस त्या मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. ते प्रत्येक नागरिकांपर्यत पोचले हेाते. त्या काळात त्यांनी ‘मोदी है तो मुमकीन है’ हे जनतेला पटवून दिले होते, तोच पंढरपूर पॅटर्न आम्ही कोल्हापुरात राबविणार आहोत.

Chandrakant Patil-Karuna Sharma-Munde
'मविआ'चे २५ आमदार भाजपच्या संपर्कात; प्रवेशाचा मुहूर्तही ठरला : दानवेंचा गौप्यस्फोट

प्रचारासाठी राज्यातीलच नेते येणार

आमदार पाटील म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या प्रचाराला केंद्रीय नेते येण्याची परंपरा नाही. पण, राज्यातील देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे प्रचाराला येणार आहेत. त्यामुळे आम्ही ही पोटनिवडणूक जिंकणार आहोत. महाआघाडीच्या कारभावर जनता नाराज आहे. वीज कनेक्शन तोडणी, एसटीचा संप, कायदा व सुव्यवस्था, मराठा समाज आरक्षण आदी प्रश्नांवरून समाजातील विविध घटकांमध्ये नाराजीची भावना आहे. ओबीसी आणि धनगर समाजाचीही सरकारकडून फसवणूक करण्यात येत आहे, त्यावर आम्ही पोटनिवडणुकीत आवाज उठवणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com