'मुक्ता टिळक मतदानाला येणार; पण लक्ष्मण जगतापांबाबत फडणवीस...'

लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या विधान परिषद निवडणूक मतदानाबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती
Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavis
Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council election) चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Mla Laxman Jagtap) आणि कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना मतदानाला आणण्याबाबत दोघांची तब्येत पाहून निर्णय घेण्यात येईल. पण, मुक्ता टिळक यांनी शुक्रवारीच जाहीरच केले आहे की, मी १९ जूनला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होऊन स्टेबल होईन. त्यानंतर २० तारखेला थेट मतदानाला जाईन. आमदार जगताप यांची तब्येत त्यापेक्षा जास्त सांभाळावी लागणारी आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जगताप कुटुंबीयांशी बोलून निर्णय करणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. (Chandrakant Patil gave information about Laxman Jagtap, Mukta Tilak's Legislative Council election voting)

आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधताना विधान परिषद निवडणुकीसंदर्भात ही माहिती दिली. ते म्हणाले की विधान परिषद निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांनाही मतदार करण्यासाठी सहाय्यक वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आयोगाकडून त्याबाबतची ऑर्डर काढण्यात आलेली आहे.

Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavis
‘आप्पा, तुम्ही मला शिव्या घातल्या...’ दरेकरांच्या वक्तव्यावर ठाकूर म्हणाले, ‘प्रसादला नक्कीच...’

विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांना फोन येत आहेत. वेळ आल्यानंतर ते उघड करू, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. कितीही अडथळा आणला तरी महाविकास आघाडी सहाही जागा जिंकणार आहे, असा दावाही पटोले यांनी केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांवर दबाव टाकला जात आहे, हे नाना पटोले यांचे म्हणणे म्हणजे जवळजवळ २० तारखेचा निकाल लागण्याचंच हे लक्षण आहे. नाना पटोले हे २० तारखेला काँग्रेस एक जागा हरल्यानंतर जी कारणं सांगावी लागतात, त्या कारणांची स्क्रीप्ट आताच तयार करत आहेत. त्यांनी जी बोगस स्क्रीप्ट तयार केली आहे, ती त्यांनी माध्यमांसमोर न्यावी.

Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavis
शेट्टींच्या नेतृत्वात काकडे-जाचक-तावरे त्रिकूट एकत्र येणार; FRPचा अंगार बारामतीत पेटणार

राऊत अपक्षांना घरगडी समजतात

राजकारणात जिंकेपर्यत किंवा पडेपर्यत काही बोलायचे नसते. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचीच विकेट पडणार आहे. कारण, राज्यसभेला देखील भाजपला ११ मते हवे होती. महाविकास आघाडीतील बेबनावचा त्यावेळी आम्हाला फायदा झाला. तसाच आता विधान परिषदेतही आम्हाला लाभ होईल. संजय राऊत अपक्षांना घरगडी समजत आहेत, हेही महत्वाचे आहे, असेही चंद्रकांत पाटलांनी नमूद केले.

Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavis
राष्ट्रवादीवर आरोप करताच गृहमंत्र्यांनी वाढवली सदाभाऊंची सुरक्षा!

अग्निपथला विरोध नको

अग्निपथ योजनेला सुरू असलेल्या विरोधावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आंदोलन करायला हरकत नाही. फक्त, ते लोकशाही मार्गाने व्हायला हवे. अग्निपथ योजना काय ते तरुणांनी समजून घ्यायला हवे. तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका, असा सल्लाही पाटील यांनी तरुणांना दिला. भाजपचा आपल्या कुठल्याही आमदारावर अविश्वास नाही. आमच्या पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष जय पांडा हे विधान परिषद निवडणुकीसाठी येत आहेत. ते विधान परिषद निवडणुक प्रक्रिया समजून सांगतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com