शिंदे सरकारचा विस्तार ठरला : मलईदार खाती भाजपला; नगरविकासवर शिंदेंची बोळवण

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्री मंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार; नाराजांना चुचकरण्यासाठी काही जागा रिक्त ठेवणार
Eknath Shinde- Devendra Fadnavis
Eknath Shinde- Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath shinde) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याचे संकेत मिळत असून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी पहिला आणि निवडणुकीनंतर दुसरा विस्तार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाराजांना चुचकारण्यासाठी काही जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा अशी मलईदार खाती भाजपकडे (BJP) जाणार असून नगरविकास, परिवहन, शिक्षण अशी खाती शिंदे गटाला मिळणार आहेत. (Cabinet expansion of the Shinde-Fadnavis government will take place in two phases)

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर या नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मात्र, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी काही मंत्र्यांचा शपथविधी, तर निवडणुकीनंतर काही मंत्र्यांना शपथ देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Eknath Shinde- Devendra Fadnavis
सांगलीत शिवसेनेला खिंडार; जिल्हाप्रमुख आनंद पवारांची एकनाथ शिंदेंना साथ!

विशेष म्हणजे जरी दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होत असला तरी सर्वच खाती लगेच भरली जाणार नाहीत. दोन ते तीन मंत्रिपद रिक्त ठेवली जातील, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाला १५ मंत्रीपदे, तर भाजप स्वतःकडे २८ मंत्रीपदे ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दोन टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार हा नाराजांना चुचकारण्यासाठी ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच, काहींनी टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठीच काही जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत.

Eknath Shinde- Devendra Fadnavis
युती ही 'लव्ह मँरेज' सारखी ; परत बोलविण्यासाठी उद्धवजींना भाजप पक्षश्रेष्ठींशी बोलावं लागेल !

असे असेल खातेवाटप

गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही विकासाभिमुख आणि मोठी आर्थिक तरतूद असणारी खाती भाजपकडे असतील. मुख्यमंत्री शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, परिवहन, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण, उद्योग आदी क्षेत्रे मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in