नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर मुंबई पालिका जेसीबी नेणार? असा आहे प्लॅन!

Narayan Rane bungalow आता शिवसेनेच्या अग्रस्थानी आल्याने नवा राजकीय वाद
Narayan Rane Bungalow
Narayan Rane Bungalow sarkarnama

मुुंबई : शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Shivsena Vs Narayan Rane) यांच्यातील संघर्ष आता टिपेला पोहोचला आहे. राणे यांच्या मुंबईतील अधीश बंगला हे आता कारवाईचे स्थान झाले आहे. (BMC issues notice to Narayan Rane bungalow in Juhu) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज तातडीने या बंगल्याची पाहणी करण्यासाठी धावपळ केली. मोजमापे घेण्याचीही त्यांनी तयारी केली. पण राणे कुटुंबियांनी वेळ मागून घेतल्याने ही पाहणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे.

त्यामुळे कोणतीच कारवाई न करता हे पथक परत फिरले. राणेंचा जुहू येथे समुद्रकिनारी अधिष बंगला आहे. या बांधकामात सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर हे गेली अनेक वर्षे करत होते. मात्र त्यांच्या तक्रारीकडे कोणी लक्ष देत नव्हते. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपविरोधात पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्याला नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर या तक्रारीची फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे. या तक्रारीनुसार पालिकेचे अधिकारी आज सायंकाळी पाचच्या दरम्यान बंगल्यावर पोलिस बंदोबस्तासाह पोहोचले होते. पण दहा मिनिटांतच ते परतले.

Narayan Rane Bungalow
सुशांतची हत्याच अन् मातोश्रीवरील चौघांना लवकरच ईडीची नोटीस! राणेंनी टाकला बॉम्ब

या प्रकरणावर बोलताना मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर म्हणाल्या की न्यायालयाने जो काही निर्णय दिला किंवा जे सरकारी नियम आहेत त्याचे उल्लंघन झाला असेल तर त्याच्या अंतर्गत पालिकेकडून कारवाई होईल. मी याबाबत अधिक माहिती घेईन आणि पुन्हा बोलेन.

आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्या म्हणण्यानुसार २०१७ मध्ये आम्ही नारायण राणे यांच्या बंगल्याच्या अनधिकृत बांधकामांची तक्रार केली होती. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले गेले आहे. याबाबत मी कालच महानगरपालिकेला कारवाई बाबतीत पत्रक दिले होते. त्यानुसार पालिकेने पावले टाकली आहेत. त्याचे आम्ही स्वागतच करतो. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी राजकीय दबाव येऊ शकतो. या बंगल्याला 2013 मध्ये भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Narayan Rane Bungalow
राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजप अडचणीत! आधी कार्यकारिणी बरखास्त नंतर बडतर्फीच्या नोटिसा

शिवसेनेच्या विरोधात अभिनेत्री कंगना राणौत हिने टीका केली होती. तेव्हाही मुंबई महापालिकेने तिच्या घरावर कारवाई केली होती. या कारवाईच्या विरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर पालिकेने पुढील नोटीस देणे थांबवले होते. आता अशाच प्रकारे राणेंवर कारवाई तर होणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महापालिकेने पाठविलेल्या नोटिसवर प्रतिक्रिया देताना आमदार नितेश राणे म्हणाले की महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने हे सर्व पाहत आहे. राणे कुटुंबीय, किरीट सोमय्या, मोहित कंबोज असो किंवा देवेंद्र फडणवीस जे कोणी या सरकार विरोधात बोलतात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. हे मैदानात आम्हाला हरवू शकत नाही. तसे असते तर यांनी मला जिल्हा बॅंक जिंकण्यापासून रोखल असत. मात्र, हे खुल्या मैदानात आमच्याशी लढू शकत नाहीत. मैदानात हरायचं आणि शेंबड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं याला काही अर्थ नाही. त्यांना ज्या-ज्या प्रकारे लढायचे आहे ते लढू द्या आणि अंगावर येऊ द्या त्यांना आम्ही नाही म्हणत नाही. मात्र, त्यांनी जा कायदेशीर नोटीस आम्हाला पाठवली तिला आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन उत्तर देऊ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com