रक्ताची नाती कधीही संपत नसतात; पण... : पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर

त्यांनी (धनंजय मुंडे) जरी आमच्यात वैर आहे, असे म्हटले तरी मी कोणाशीही वैर बाळगत नाही.
Pankaja Munde-Dhananjay Munde
Pankaja Munde-Dhananjay MundeSarkarnama

बीड : रक्ताची नाती कधीही संपत नसतात. राजकारणात मला कोणी वैरी आहे, असे वाटत नाही. पण, जो जनतेच्या हिताचा वैरी आहे, तो माझा वैरी आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपले भाऊ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना प्रत्युत्तर दिले. (Blood ties never end : Pankaja Munde)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आता आमच्यात बहिण-भावाचे नाते राहिले नाही, असे विधान औरंगाबादमध्ये बोलताना केले होते. त्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी काहींशी संयत भूमिका व्यक्त केली आहे.

Pankaja Munde-Dhananjay Munde
आमदारांना माहित नसलेला पंढरीचा विकास आराखडा कुणी तयार केला : भालकेंचा हल्लाबोल

पंकजा मुंडे म्हणाल्या की, रक्ताची नाती कधीही संपत नसतात. आम्ही ज्या घरात जन्मलो आहे, ती नातीही कधी संपत नाहीत. त्यांनी (धनंजय मुंडे) जरी आमच्यात वैर आहे, असे म्हटले तरी मी कोणाशीही वैर बाळगत नाही. माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही. मी व्यक्तीच्या विचारांशी राजकारणाची तुलना करत असते. त्यामुळे राजकारणात मला कोणी वैरी आहे, असे वाटत नाही. जो जनतेच्या हिताचा वैरी आहे, तो माझा वैरी आहे.

Pankaja Munde-Dhananjay Munde
मागील सरकारच्या काळात विरोधकांनी सातत्याने त्रास दिला : हर्षवर्धन पाटलांचा रोख कोणाकडे?

धनंजय मुंडे काय म्हणाले होते?

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि आमच्यात आता बहिण-भाऊ म्हणून नातं राहिलंच नाही. राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे वैरी आहोत आमच्यात पूर्वी नातेसंबंध होते. नात्यातून आमच्यात राजकारणामध्ये वैर निर्माण झाले. त्यामुळे कुणाच्या वक्तव्यामुळे, वागण्यामुळे त्याचे काय परिणाम होतात, हे ज्यांनी त्यांनी आत्मपरिक्षण करावे. अशा पद्धतीची वक्तव्ये त्यांच्याकडून (पंकजा मुंडे) वारंवार येत आाहेत. ती बरोबर की चुकीची आहेत, याचे ज्यांनी त्यांनी आकलन करून त्या पद्धतीने मांडणी करावी, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com