गोव्यात हे जिंकले आणि हे हरले!

गोव्यात भाजपने सत्ता मिळविण्याची हॅट्‌ट्रीक केली आहे. त्याचबरोबरच विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंतही तिसऱ्यांदा जिंकून आले आहेत.
Goa assembly election result
Goa assembly election resultANI

पणजी : गोवा विधानसभेच्या सर्व ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. गोव्यात भाजपने (bjp) सत्ता मिळविण्याची हॅट्‌ट्रीक केली आहे. त्याचबरोबरच विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंतही तिसऱ्यांदा जिंकून आले आहेत. मात्र, त्यांचे मताधिक्य या निवडणुकीत घटले आहे. गोव्यात भाजपने सर्वाधिक २० जागा जिंकल्या आहेत. (BJP's hat trick of power in Goa)

गोवा निवडणूक निकालात पहिल्या टप्प्यात मोठे चढ-उतार दिसून आले. सुरुवातीला काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून आली. पण जसजसे फेऱ्या वाढत गेल्या तसतसे भाजपने आघाडी घेण्यास सुरुवात केली. अंतिम फेरीअखेर भाजपने २० जागा जिंकल्या असून काँग्रेस पक्षाला ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे. आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष यांना दोन जागा मिळाल्या आहेत. इतरांनी ५ जागांवर वर्चस्व मिळविले आहे. तृणमूल काँग्रेसला मात्र खाते उघडता आलेले नाही. (Goa assembly election result updates)

Goa assembly election result
मोठी बातमी : उपमुख्यमंत्री मौर्य पराभवाच्या उंबरठ्यावर; भाजपने मतमोजणी रोखली

दरम्यान पहिल्या टप्प्यात पिछाडीवर असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत चौथ्या फेरीअखेर आघाडीवर आले. सुरुवातीला ४३६ मतांनी पिछाडीवर असलेले सावंत यांनी चौथ्या फेरीनंतर तब्बल ६०५ मतांची आघाडी घेतली. शेवटच्या फेरीनंतर त्यांनी सुमारे ५०० मतांनी विजय मिळविला आहे.

Goa assembly election result
प्रमोद सावंतांच्या हॅट्‌ट्रीकपुढे अनेक अडथळे होते; पण... : भेगडेंनी उलगडले विजयाचे गणित!

गोवा विधानसभा निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवार मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे :

1) हळदोणे

- ग्लेन टिकलो (भाजप)

- कार्लोस फरेरा (काँग्रेस)

2) बाणावली

- व्हेन्झी व्हिएगस (आप)

- टोनी डायस (काँग्रेस)

- चर्चिल आलेमाव (तृणमूल)

3) डिचोली

- चंद्रकांत सावळ (अपक्ष)

- नरेश सावळ (मगो)

- राजेश पाटणेकर (भाजप)

4) कळंगुट

- मायकल लोबो (काँग्रेस)

- जोसेफ सिक्वेरा (भाजप)

5) काणकोण

- रमेश तवडकर (भाजप)

- जनार्दन भंडारी (काँग्रेस)

- इजिदोर फर्नांडिस (अपक्ष)

6) कुठ्ठाळी

- गिरीश पिल्लई (अपक्ष)

- आंतोनियो वाझ (अपक्ष)

- गिल्बर्ट रॉड्रिग्स (तृणमूल)

7) कुंभारजुवे

- राजेश फळदेसाई (काँग्रेस)

- रोहन हरमलकर (अपक्ष)

8) कुंकळ्ळी

- युरी आलेमाव (काँग्रेस)

- क्लाफास डायस (भाजप)

- विल्सन कार्दोझ (रिव्होल्युशनरी गोवन्स)

9) कुडचडे

- नीलेश काब्राल (भाजप)

- अमित पाटकर (काँग्रेस)

10) कुडतरी

- आलेक्स रेजिनाल्डा लॉरेन्स (अपक्ष)

- रुबर्ट परेरा (रिव्होल्युशनरी गोवन्स)

- डॉमनिक गावकर (आप)

11) दाबोळी

- माविन गुदिन्हो (भाजप)

- कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस (काँग्रेस)

12) फातोर्डा

- विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड)

- दामू नाईक (भाजप)

13) मये

- प्रेमेंद्र शेट (भाजप)

- संतोष सावंत (गोवा फॉरवर्ड)

14) मांद्रे

- जीत आरोलकर (मगो)

- दयानंद सोपटे (भाजप)

- लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष)

15) म्हापसा

- जोशुआ डिसोझा (भाजप)

- सुधीर कांदोळकर (काँग्रेस)

16) मडकई

- रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर (मगो)

- प्रेमानंद गावडे (रिव्होल्युशनरी गोवन्स)

- सुदेश भिंगी (भाजप)

17) मडगाव

- दिगंबर कामत (काँग्रेस)

- मनोहर (बाबू) आजगावकर (भाजप)

18) मुरगाव

- संकल्प आमोणकर (काँग्रेस)

- मिलिंद नाईक (भाजप)

19) नावेली

- आवेर्तान फुर्तादो (काँग्रेस)

- वालंका आलेमाव (तृणमूल)

- प्रतिमा कुतिन्हो (आप)

20) नुवे

- आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस)

- अरविंद डिकॉस्ता (रिव्होल्युशनरी गोवन्स)

21) पणजी

- आतानासियो (बाबूश) मोन्सेरात (भाजप)

- उत्पल पर्रीकर (अपक्ष)

- एल्विस गोम्स (काँग्रेस)

22) पेडणे

- प्रवीण आर्लेकर (भाजप)

- राजन कोरगावकर (मगो)

23) फोंडा

- केतन भाटीकर (मगो)

- राजेश वेरेकर (काँग्रेस)

- रवी नाईक (भाजप)

24) पर्ये

- दिव्या राणे (भाजप)

- विश्वजीत कृ. राणे (आप)

25) पर्वरी

- रोहन खंवटे (भाजप)

- संदीप वझरकर (तृणमूल)

26) प्रियोळ

- पांडुरंग (दीपक) ढवळीकर (मगो)

- गोविंद गावडे (भाजप)

27) केपे

- एल्टन डिकॉस्ता (काँग्रेस)

- चंद्रकांत (बाबू) कवळेकर (भाजप)

28) साळगाव

- केदार नाईक (काँग्रेस)

- जयेश साळगावकर (भाजप)

29) सांगे

- सुभाष फळदेसाई (भाजप)

- सावित्री कवळेकर (अपक्ष)

- प्रसाद गावकर (काँग्रेस)

30) साखळी

- डॉ. प्रमोद सावंत (भाजप)

- धर्मेश सगलानी (काँग्रेस)

31) सावर्डे

- गणेश गावकर (भाजप)

- दीपक प्रभू पाऊसकर (अपक्ष)

- विनायक गावस (मगो)

32) शिवोली

- दिलायला लोबो (काँग्रेस)

- दयानंद मांद्रेकर (भाजप)

33) शिरोडा

- सुभाष शिरोडकर (भाजप)

- महादेव नाईक (आप)

34) सांत आंद्रे

- वीरेश बोरकर (रिव्होल्युशनरी गोवन्स)

- फ्रान्सिस सिल्वेरा (भाजप)

35) सांताक्रूझ

- रुडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस)

- अंतोनियो फर्नांडिस (भाजप)

- अमित पालेकर (आप)

36) ताळगाव

- जेनिफर मोन्सेरात (भाजप)

- टोनी रॉड्रिग्स (काँग्रेस)

37) थिवी

- नीळकंठ हळर्णकर (भाजप)

- कविता कांदोळकर (तृणमूल)

38) वाळपई

- विश्वजीत राणे (भाजप)

- तुकाराम (मनोज) परब (रिव्होल्युशनरी गोवन्स)

39) वास्को

- कृष्णा (दाजी) साळकर (भाजप)

- कार्लुस आल्मेदा (काँग्रेस)

40) वेळ्ळी

- क्रूझ सिल्वा (आप)

- सावियो डिसिल्वा (काँग्रेस)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com