विधान परिषद निवडणूक : महाआघाडीला भाजप झुंजवणार; पाचवा उमेदवार रिंगणात उतरवणार?

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीने चौथा उमेदवार मागे घेतला, तर मात्र भाजप विधान परिषदेसाठी चारच उमेदवार देणार असल्याचे सांगितले जात आहे.
BJP-Mahavikas AAghagdi
BJP-Mahavikas AAghagdiSarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्ष (BJP) राज्यसभेप्रमाणेच (Rajya Sabha) आगामी विधान परिषदेच्या (Legislative Council Election) निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नाकीनाऊ आणण्याच्या तयारी आहेत. कारण, २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आपला पाचवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीच पत्रकार परिषदेत बोलताना तसे संकेत दिले आहेत. (BJP will field fifth candidate in Legislative Council elections)

राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेची निवडणूक आहे. एकूण १० आमदार निवडून देण्यासाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. त्याचीही तयारी भाजपने आतापासूनच सुरू केल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या सध्याच्या संख्याबळानुसार त्यांचे चार उमेदवर निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने पाचवा उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

BJP-Mahavikas AAghagdi
भालकेंच्या बैठकीत राडा : ऊसबिल मागणाऱ्या शेतकऱ्याला राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीने चौथा उमेदवार मागे घेतला, तर मात्र भाजप विधान परिषदेसाठी चारच उमेदवार देणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेच्या बदल्यात विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष

BJP-Mahavikas AAghagdi
तब्बल १५ वर्षानंतर ‘यूपीएससी‘त फडकला पिंपरी-चिंचवडचा झेंडा

संख्याबळानुसार विधान परिषदेत भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. सभेसाठी निवडणूक झाली तर मात्र भाजप विधान परिषदेसाठी पाचवा उमेदवारही देणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

अजित पवार काय म्हणाले?

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार देणार आहे. काँग्रेसचाही दोन उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. भाजपकडे चार उमेदवार निवडून येतील एवढी मते असताना त्यांचा पाचवा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न चालेला आहे, अशी माहिती मिळत आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

विधान परिषद निवडणुकीचे असे आहे गणित

विधान परिषदेवर निवडणून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ होत आहे, त्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात.

भाजपकडून ही नावे चर्चेत

भाजपकडून विद्यमान आमदारांपैकी प्रवीण दरेकर यांची उमेदवारी निश्चित मानले जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी म्हणून लाड यांचाही फेरविचार होऊ शकतो. नव्या सदस्यांमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, चित्रा वाघ, कृपाशंकरसिंह यांच्या नावाची चर्चा आहे. विनायक मेटे मात्र गॅसवर राहू शकतात. त्याऐवजी इतर नेत्यांना भाजप संधी देण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com