भाजपची मोठी ऑफर : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, तर श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री?

एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून केंद्र अन्‌ राज्यात मिळणार १५ मंत्रीपदे
भाजपची मोठी ऑफर : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, तर श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री?
Shrikant Shinde News, Eknath Shinde News in Marathi, Political Crisis in MaharashtraSarkarnama

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सत्ता समीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. शिंदे यांच्याकडे तब्बल ३५ पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापनेचा शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर देण्यात आली आहे. त्यात खुद्द शिंदे उपमुख्यमंत्री, त्यांचा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. (BJP offers Deputy Chief Minister to Eknath Shinde)

सत्तेच्या वाघाटीमध्ये एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर देण्यात आलेली आहे. यामध्ये शिंदे गटाला राज्यात ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपदं देण्यात येणार आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार आहे. तसेच, शिंदे यांच्या समर्थक खासदारांना केंद्रात २ मंत्रिपद मिळणार आहेत. त्यामध्ये शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश असणार आहे. (Political Crisis in Maharashtra)

Shrikant Shinde News, Eknath Shinde News in Marathi, Political Crisis in Maharashtra
उद्धव ठाकरेंकडे उरले दोन कॅबिनेट मंत्र्यांसह केवळ पंधरा आमदार! ही नावं पक्की...

राज्यातील सत्तासमीकरणारत शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड व कृषी मंत्री दादा भुसे यांना दोन शिलेदाराना भाजप सरकारमध्ये महत्वाची खाती देण्यात येणार आहेत? तसेच, केंद्र सरकारमध्ये शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत यांनाही महत्वाचे मंत्रीपद मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Shrikant Shinde News, Eknath Shinde News in Marathi, Political Crisis in Maharashtra
पंढरपुरच्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना येऊ दे ; पुण्यात झळकले पोस्टर, विठ्ठलाला साकडे

शिवसेना नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी यशस्वी बंड केल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. शिंदे यांच्याकडे गुहावटीत तब्बल ३५ पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत असल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधत असताना एकनाथ शिंदे यांची भाजप नेत्यांशी बोलणी सुरू आहेत.

Shrikant Shinde News, Eknath Shinde News in Marathi, Political Crisis in Maharashtra
आकडे जुळले; आशिष जयस्वाल, केसरकरांसह आणखी चार आमदार गुवाहाटीत

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत खलबत करून मुंबईत दाखल झाले आहेत. ते मुंबईत येताच सागर बंगल्यावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिंदे यांच्या बंडाशी आमचा काही संबंध नाही, असे भाजपवाले सांगत असले तरी वस्तुस्थिती ती नाही. फडणवीस हे मुंबईत बसून सूत्र हलवत असल्याने त्यांचे विश्वासू संजय कुटे मात्र एकनाथ शिंदे थांबलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. शिंदेंशी ते स्वतः बोलत आहेत. त्यामुळे एक प्रकारे सत्तेच्या वाटाघाटी वेगात सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in