‘आप्पा, तुम्ही मला शिव्या घातल्या...’ दरेकरांच्या वक्तव्यावर ठाकूर म्हणाले, ‘प्रसादला नक्कीच...’

हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी भाजप नेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन विरारमध्ये दाखल
Praveen Darekar-Girish Mahajan-Hitendra Thakur
Praveen Darekar-Girish Mahajan-Hitendra ThakurSarkarnama

विरार : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही (Legislative Council election) हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या बहुजन विकास आघाडीला मोठे महत्व आले आहे. ठाकूर यांची तीन मते मिळावीत, यासाठी सर्वच पक्षाचे नेते विरारला येत आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह भाजप नेते आज ठाकूरांच्या भेटीला आले होते. त्यावेळी ‘आप्पा मला शिव्या दिलेल्या आहेत, असे मी ऐकलं,’ असे उत्स्फूर्त उद्‌गार दरेकर यांनी काढले. त्यावर ‘प्रसाद (प्रसाद लाड) आला असता तर नक्कीच शिव्या घातल्या असता’ असे उत्तर ठाकूर यांनी दिले. ही चर्चा पत्रकारांसमोर चालल्याचे पाहून महाजनांनी ती आवरली. (BJP leader Praveen Darekar and Girish Mahajan arrived in Virar to meet Hitendra Thakur)

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन हे आज हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी विरारमध्ये दाखल झाले आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयात ही भेट होत असून बंद दरवाज्याआड त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या तीन मातांना मोठे महत्त्व आले आहे.

Praveen Darekar-Girish Mahajan-Hitendra Thakur
शेट्टींच्या नेतृत्वात काकडे-जाचक-तावरे त्रिकूट एकत्र येणार; FRPचा अंगार बारामतीत पेटणार

या वेळी गाडीतून उतरताच ‘आप्पा मी ऐकलं, मला तुम्ही शिव्या दिलेल्या आहेत...’ असे उत्स्फूर्त उद्‌गार हितेंद्र ठाकूर यांना पाहून प्रवीण दरेकर यांनी काढले. त्यावर ‘प्रसाद (प्रसाद लाड) आला असता तर नक्कीच शिव्या घातल्या असत्या’ असे उत्तर हितेंद्र ठाकूर यांनी दिले. ही चर्चा पत्रकारांसमोर खुलेपणाने सुरू आहे, हे लक्षात येताच मात्री मंत्री गिरीश महाजनांनी ती आवरती घेतली. त्यानंतर हे सर्वजण ठाकूर यांच्या कार्यालयात चर्चेसाठी गेले आहेत. त्यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मदत करावी, यासासाठी भाजपकडून ठाकूर यांना गळ घातली जात आहे.

Praveen Darekar-Girish Mahajan-Hitendra Thakur
राष्ट्रवादीवर आरोप करताच गृहमंत्र्यांनी वाढवली सदाभाऊंची सुरक्षा!

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या सोमवारी (ता. २० जून) मतदान होणार आहे. तत्पूर्वी सर्वपक्षीय उमेदवारांकडून मतांची जुळवा जुळव सुरू आहे. दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात असल्याने अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना महत्व आले आहे. त्यातही तीन आमदार असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी सर्वच पक्षाचे नेते येत असून मतासाठी त्यांना गळ घालत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com