Pankaja Munday News : पंकजांची खडसेंशी बंद दाराआड चर्चा; निर्वाणीचा इशारा अन् अमित शाहांची भेट घेणार : महाराष्ट्रात पुन्हा एक राजकीय भूकंप?

Gopinath Munde News : पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Pankaja Munday News
Pankaja Munday NewsSarkarnama

Pankaja Munday Latest news : मी लोकांसाठी राजकारणात आले आहे. माझ्या भूमिका स्पष्ट असतात. मात्र, असा काय गुन्हा केला त्यामुळे माझ्यावर वनवासात जाण्याची वेळ आली आहे. याबाबत मी माझ्या नेत्यांना भेटणार, असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यावरुन भाजपमध्ये (BJP) पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा आज ( ३ जून ) स्मृतिदिन आहे. त्यानिमीत्ताने पंकजा परळी येथली गोपीनाथ गडावर बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून माझ्याबाबत तुमच्या मनात काय सुरू आहे, हे थेट विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

Pankaja Munday News
Pankaja Munde : मी माझ्या नेत्यांना भेटणार अन्...; पंकजा मुंडेंना व्यक्त केली मनातील खदखद

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे (Eknath Khadse) गोपीनाथ गडावर गेले होते. तेव्हा पंकजा यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर पंकजा यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ''इथे वादळ येणार होते, मात्र त्याची दिशा बदलली,'' असे पंकजा प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

तसेच कोणत्याही राजकारण्याला किंवा बलाढ्य नेत्याला निमंत्रण दिलेले नाही. फक्त भजन किर्तन व गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी कार्यक्रम ठेवला. त्या नात्याने एकनाथ खडसे गडावर आले आहेत. कारण, खडसे कोरोनामध्ये येऊ शकले नव्हते. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना गडावर येण्याचा अधिकार आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडेंचे सहकारी असल्याने ते दर्शनाला आले होते, असे स्पष्टीकरणही पंकजा यांनी यावेळी दिली.

Pankaja Munday News
Dhananjay Munde News : मी रात्रभर झोपलो नाही; कारण, गोपीनाथ मुंडेंचे फोटो... : धनंजय मुंडेंकडून आठवणींना उजाळा

मात्र, या भेटीनंतर केल्या भाषणात, आता माझा पिता नाही. त्यामुळे मनातील खंत माझे नेते अमित शाह यांना भेटून व्यक्त करणार आहे. मी त्यांची भेट घेणार आहे. मी त्यांना वेळ मागितला आहे. त्यांच्याशी मी मनमोकळेपणाने बोलणार आहे. त्यांना विचारणार आहे की माझ्याबद्दल तुमच्या मनात काय आहे? माझ्याबाबत स्पष्टता आल्याशिवाय मला पुढे लोकांना विश्वास देता येणार नाही. त्यानंतर काय होईल, त्याबाबतही असेच जाहीरपणे सांगेन." असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केले.

एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा आणि त्यानंतर पंकजा मुंडेंनी केलेल्या भाषणाची अधिक चर्चा होत आहे. मागली अनेक दिवसांपासून पंकजा नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे. त्यांना अनेक पक्षांनी पक्ष प्रवेशाच्या ऑफरही दिल्या आहेत. त्यामुळे पंकजा काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com