पंकजा मुंडे दोन वर्षात साचलेल्या कोणत्या गोष्टींवर उद्या बोलणार!

''मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे, '' असल्याचे पंकजा मुंडे (Pankaja Munde) सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

पंकजा मुंडे दोन वर्षात साचलेल्या कोणत्या गोष्टींवर उद्या बोलणार!
Pankaja Mundesarkarnama

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) उद्याच्या दसरा मेळाव्यात (Dussehra Melawa) काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. गेल्या वर्षी हा मेळावा ऑनलाइन झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. मात्र, आता यंदा हा मेळावा जाहीररित्या होत असल्याने या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊन पूर्णतः शिथिल झालेलं आहे. सभांना परवानगी देण्यात आली आहे. ''मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे, '' असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

''आपण सर्वजण उद्याच्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहोत. दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत. तुमचंही ऐकायचं आहे, मलाही बोलायचं आहे. या दोन वर्षात अनेक घटना घडल्या. या दोन वर्षात मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, अनेक संघर्ष, अनेक यश-अपयश याची सर्व कहाणी. तिथून आपण कोणती उमेद घ्यायची आणि भविष्याचा प्रवास कसा करायचा हा भाषणाचा सूर असेल. मी काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष आहे, माझंही लक्ष आहे, कारण मी जे काही बोलते ते स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने बोलते. भगवान बाबांच्या आशिर्वादाने आणि मुंडे साहेबांच्या संस्कारावर आधारीत बोलते. त्यामुळं आपण कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाला उपस्थित राहावं,'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाला दहा हजारांची लाच घेताना अटक

यंदाच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे या दसरा मेळाव्याची, कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरु झालीय. उद्या होणार्‍या या दसरा मेळाव्याला कोण कोण नेतेमंडळी येणार आणि यावेळी पंकजा मुंडे काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दीड ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अशा अनेक घटना घडल्या, की ज्यामुळे खुद्द पंकजा मुंडे यांच्यासह बहीण प्रीतम मुंडे यादेखील पक्षातील काही कुरघोड्यांमुळे नाराज होत्या. कार्यकर्त्यांमधून प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने राजीनामा सत्र देखील सुरू झाले होते. मात्र आता ही नाराजगी काहीशी दूर झाल्याचं दिसत आहे. मात्र असं असलं तरी आता उद्या होणार्‍या या मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार ? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंकजा मुंडे यांच्या या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी बीडच्या (Beed) सावरगावघाटमध्ये कार्यक्रते करीत आहेत. दसरा मेळाव्याला बीड जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याने, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भगवानभक्ती गडावरील मेळाव्याला परवानगी दिली नाही. यामुळे पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन दसरा मेळावा होईल असं सांगितलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासह काही मोजक्या कार्यकर्त्यांसह हा दसरा मेळावा ऑनलाइन पार पडला. मात्र या मेळाव्यानंतर खुद्द पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस यांच्यासह अनेकांवर प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.