मोठी बातमी : शिवसेना एकनाथ शिंदेंची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करणार?

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड केली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : नगरविकास मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेने (Shivsena) आज (ता. २५ जून) तातडीने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक दुपारी शिवसेना भवन येथे बोलावली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणी समितीतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Big news: Shiv Sena will expel Eknath Shinde from the national executive?)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश शिवसेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणीतून हकालपट्टी करण्याचा ठराव मांडला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, लीलाधर डाके, रामदास कदम, संजय राऊत, सुधीर जोशी, अनंत गीते, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे.

Eknath Shinde
छाटछूट हल्ल्याला आम्ही घाबरत नाही; करारा जवाब मिलेगा : सावंतांकडून शिवसेनेला प्रत्युतर

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी निवड केली आहे. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वेळोवेळी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनाच अध्यक्षपदी निवडण्यात आलेले आहे. त्यामुळे कार्यकारिणीचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

Eknath Shinde
‘तानाजी सावंत कळीचे नारद, ते शिवसैनिक नाहीत’ : शिवसैनिकांनी पुण्यातील कार्यालय फोडले

शिवसेनेत बंड केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यपदावर आता गदा आली आहे. तसेच, सुधीर जोशी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय कार्यकारणीतील एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर नव्या नेत्याची निवड या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत होईल, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची राष्ट्रीय कार्यकारणीतून हकालपट्टी केल्यानंतर ते फक्त शिवसेनेचे सदस्य म्हणून कार्यरत असतील. मात्र, त्यांच्याकडे कोणत्याही पदाचा आता पदभार नसेल, असेही या सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in