Bhima Sugar Factory Result : धनंजय महाडिकांची दणदणीत बाजी; विश्वराजही विजयाच्या उंबरठ्यावर!

धनंजय महाडिक यांनी संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून त्यांनी ३१ मते घेतली असून त्यांचे विरोधातील उमेदवार राजेंद्र चव्हाण यांना १२ मते मिळाली आहेत.
 Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik sarkarnama

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Bhima Sugar Factory) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या भीमा परिवार पॅनेल विजयाच्या उंबरठ्यावर असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष महाडिक हे संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून महाडिक यांनी ३१ मिळविली आहेत. (Bhima Factory Result : Dhananjay Mahadik wins from Sanstha representative constituency)

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक गट हा विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या फेरीअखेर तब्बल २२६४ मतांनी आघाडीवर असलेला भीमा परिवार पॅनेलने दुसऱ्या फेरीतही आघाडी वाढवत नेली आहे. ती तब्बल सात हजारांच्या आसपास असेल, खुद्द महाडिक यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाडिक गट भीमा कारखान्यात हॅट्‌ट्रीक करणार हे आता निश्चित असून आघाडी कुठपर्यंत जाणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 Dhananjay Mahadik
राऊत-आव्हाडांवरील गुन्हे मागे घ्या; आम्ही शिंदे गटात प्रवेश करतो : शिवसेना नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांना ऑफर!

खासदार धनंजय महाडिक यांनी संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून त्यांनी ३१ मते घेतली असून त्यांचे विरोधातील उमेदवार राजेंद्र चव्हाण यांना १२ मते मिळाली आहेत. तब्बल १९ मते अधिक घेत खासदार धनंजय महाडिक यांनी संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून विजय मिळविला आहे.

 Dhananjay Mahadik
Bhima Sugar Factory Result : पाटील-परिचारक गटाने पराभव स्वीकारला; बाळराजेंची सूचक पोस्ट!

दुसरीकडे, धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक हे पुळूज गटातून निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरले आहेत. विश्वराज यांना पहिल्या फेरीत ५८२६ मते मिळाली असून त्यांच्या विरोधातील राजन पाटील-प्रशांत परिचारक गटाचे उमेदवार देवानंद गुंड यांना २१७७ ममते मिळाली आहेत. गुंड यांच्यापेक्षा महाडिक हे पहिल्या फेरीतच ३६४९ मतांनी आघाडीवर होते.

 Dhananjay Mahadik
Bhima Factory Result : महाडिकांची विजयाच्या हॅट्‌ट्रीकडे वाटचाल; पहिल्या फेरीत पॅनेल सरासरी २२०० मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरीतही महाडिक गटाची आघाडीची घौडदौड कायम आहे. त्यांची मतांची आघाडी वाढली असून ती सात हजारापर्यंत असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

 Dhananjay Mahadik
Bhima Sugar Factory : पहिल्या फेरीअखेर महाडिकांच्या पॅनेलचा डंका!

पहिल्या फेरीत आघाडीवर असलेले धनंजय महाडिक यांच्या पॅनलचे उमेदवार

पुळूज व्यक्ती उत्पादक गट

विश्वराज महाडिक- 5826(महाडिक पॅनल)

देवानंद गुंड - 2177 (राजन पाटील पॅनल)

(आघाडी - 3649)

पुळूज व्यक्ती उत्पादक गट

बिभीषण वाघ- 5621(महाडिक पॅनल)

कल्याणराव पाटील - 2229(राजन पाटील पॅनल)

(आघाडी -3392)

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट

संभाजी कोकाटे - 5810(महाडिक पॅनल)

शिवाजी भोसले - 2250(राजन पाटील पॅनल)

(आघाडी -3560)

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट

सुनील चव्हाण - 5822(महाडिक पॅनल)

राजाराम माने - 2153(राजन पाटील पॅनल)

(आघाडी - 3669)

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट

तात्यासाहेब नागटिळक - 5795(महाडिक पॅनल)

पंकज नायकुडे - 2199(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3596

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट

संतोष सावंत - 5537(महाडिक पॅनल)

विठ्ठल रणदिवे - 2133(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3404

अंकोली व्यक्ती उत्पदक गट

सतीश जगताप - 5703(महाडिक पॅनल)

भारत पवार - 2176(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3527

गणपत पूदे - 5557(महाडिक पॅनल)

रघुनाथ सुरवसे - 2052(राजन पाटील पॅनल)

आघाडी,- 3505

कोन्हेरी गट

राजेंद्र टेकळे - 5766(महाडिक पॅनल)

कुमार गोडसे -2416(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3350

अनुसूचित जाती जमाती

बाळासाहेब गवळी - 5775(महाडिक पॅनल)

भारत सुतकर - 2275(राजन पाटील पॅनल)

आघाडी : 3500

महिला राखीव

सिंधू जाधव - 5861(महाडिक पॅनल)

अर्चना घाडगे -2230(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3631

महिला राखीव

प्रतीक्षा शिंदे - 5709 (महाडिक पॅनल)

सुहासिनी चव्हाण - 2192(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3517

इतर मागास प्रवर्ग

अनिल गवळी -5900 (महाडिक पॅनल)

राजाभाऊ भंडारे - 2231(राजन पाटील पॅनल)

आघाडी : 3669

भटक्या विमुक्त जाती जमाती

सिद्राम मदने - 5842 (महाडिक पॅनल)

राजू गावडे - 2215(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3627

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com