Nashik Graduate Election News : बाळासाहेब थोरतांची सध्याची भूमिका म्हणजे; मौनं सर्वार्थ साधनम्

Nashik Graduate Election News : राज्यातील पाचही विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधरच्या निवडणुकीची सर्वाधीक चर्चा होत आहे.
Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat NewsSrkarnama

Balasaheb Thorat News : राज्यातील पाचही विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधरच्या निवडणुकीची सर्वाधिक चर्चा होत आहे. नाशिकमधून सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र, या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी कोणतीच भूमिका घेतलेली नाही. त्यावरुन सध्या राज्यभरात एकच चर्चा सुरु आहे.

बाळासाहेब थोरात सध्या मुंबईमध्ये आहेत, अशी माहिती मिळत आहे. मात्र, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते कोणाशी बोलतही नाहीत आणि भेटतही नाहीत. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांचे निलंबन केले. तसेच सत्यजीत तांबे यांच्यावरही कारवाई केली, मात्र, बाळासाहेबांनी आपले मौनं तोडले नाही.

Balasaheb Thorat News
Gadakh and Ghule : नगरमध्ये नव्या राजकारणाची नांदी; गडाख-घुले झाले व्याही-व्याही

त्यामुळे त्यांची भूमिकाच स्पष्ट होत नाही. ते मुंबईत असले तरी नगरमधील काँग्रेसची (Congress) यंत्रणा आणि बाळासाहेब थोरात यांची स्वत:ची संगमनेरमधील यंत्रणा सत्यजीत यांच्यासाठी काम करताना दिसत आहे. त्यामुळे आपण सध्या शांत राहण्यातच भलाई आहे असे थोरात यांना वाटत असावे, असे राजकीय जाणकार सांगतात.

दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे ते आता काँग्रेसचे उमेदवार नाहीत तर त्यांनी भाजपचाही (BJP) पाठिंबा घेतलेला नाही. त्यामुळे अपक्षच निवडून येण्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदान होईपर्यंत भूमिकाच जाहीर करायची नाही, असे काहीसे थोरात यांचे दिसत आहे. कारण भाचा आमदार होतोय, आणि तोही अपक्ष त्यामुळे आपला या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे थोरात म्हणू शकतात.

Balasaheb Thorat News
Kasaba By-Election : कसब्यात निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच; काँग्रेसकडून पाच संभाव्य नावे निश्चित!

तसेच सत्यजीत तांबे जर आमदार झाले तर थोरात यांच्यापुढील मोठी अडचण दुर होणार आहे. कारण संगमनेरमधून थोरात यांची कन्या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. सत्यजीत हे निवडून आल्यास थोरात यांच्या मुलीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे सध्या मौनं धारण करण्यातच आपली भलाई असल्याचे थोरात यांना वाटत असावे, असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in