ठाकरे-पवार सरकार बनावे, ही तर बाळासाहेबांचीच इच्छा!

जे सरकारमध्ये असताना पाच वर्षे आम्हाला बोलायला टाळायचे, ते आमच्याशी बोलायला लागले. कशाला पवारांबरोबर जाता, असे ते आम्हाला म्हणत होते.
ठाकरे-पवार सरकार बनावे, ही तर बाळासाहेबांचीच इच्छा!
sharad pawar-Balasaheb ThackeraySarkarnama

मुंबई : पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवार (Ajit pawar) यांच्यासोबत जे आमदार गेले होते, ते एकएक परत येत होते. त्यात अगदी धनंजय मुंडेही होते. जी जी नाव येत होती, ते सर्वजण परत आले. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाकडून निरोप येत होते, जे सरकारमध्ये असताना पाच वर्षे आम्हाला बोलायला टाळायचे, ते आमच्याशी बोलायला लागले. कशाला पवारांबरोबर जाता, असे ते आम्हाला म्हणत होते. पण, बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) इच्छा होती. ठाकरे आणि पवार एकत्र आले, तर देशाचे राजकारण बदलेल, असे बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेबांची ती इच्छा मी पूर्ण केली, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. (Balasaheb Thackeray wanted Thackeray-Pawar government to be formed : Sanjay Raut)

साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचे पुन्हा एकदा समर्थन केले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, त्या गोष्टींमुळे आमच्या पायाखालची जमीन अजिबात सरकलेली नाही. मी वॉक करून आलो, दोन ते तीन प्रमुख लोकांचे फोन आले. फडणवीस शपथ घेत आहेत, टीव्ही बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी सुरू आहे. मी म्हटलं काल रात्री तर ते आमच्याबरोबर होते, खूश होते. संध्याकाळी कदाचित चित्र बदललं असेल. मी म्हटलं की 24 तासांत खेळ संपेल. त्यानंतर मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी बोललो. आमच्यातील काही लोक म्हणाले की, संजय राऊत यांनी पक्ष बुडवला. पण मला आत्मविश्वास होता. शिवसेनेचाच मुख्यमंत्री शपथ घेणार, हे मी मीडियाशीही बोललो होतो.

sharad pawar-Balasaheb Thackeray
मी पवारांचा माणूस हा माझ्यावर ठपका; पण...

यशवंतराव चव्हाण सेंटरला तीनही पक्षाच्या प्रमुखांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे ९ आमदार परत आले होते. तीन आमदार ‘सिल्वर ओक’ला आले होते. त्यात अगदी राजेश टोपे होते. मग सगळ्यांना फोन लावले. सगळे म्हणाले, आम्ही येतो आहोत, अगदी धनंजय मुंडेही त्यात होते. जी जी नावे पुढे येत होती, ते सर्वजण परत येत होते. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाकडून निरोप येत होते, जे सरकारमध्ये असताना पाच वर्षे आम्हाला बोलायला टाळायचे, ते आमच्याशी बोलायला लागले. कशाला पवारांबरोबर जाता. पण, बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. ठाकरे आणि पवार एकत्र आले, तर देशाचे राजकारण बदलेल, असे बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेबांची ती इच्छा मी पूर्ण केली.

sharad pawar-Balasaheb Thackeray
संतापलेल्या अशोक पवारांनी अवघ्या १० मिनिटांतच रेशनकार्ड मिळवून दिले!

तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात येणार का याबाबत आमच्या पक्षातही शंका होती. काही आमदारांमध्ये अस्वस्थता होती. कुणाला माहीत नव्हतं, काय सुरु आहे ते. पण, मी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माहीत होतं काय चाललं होते ते. शिवसेनेत मला आणि उद्धव ठाकरेंना माहीत होतं, आम्ही काय करतोय आणि काय चाललं आहे. आमच्या फक्त मोजकचं बोलणं होत होतं, असा किस्सा संजय राऊत यांनी यावेळी सांगितला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in