Asim Sarode News : ...तर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक रद्द होऊ शकते; असीम सरोदेंनी वाढवले उमेदवारांचे टेन्शन

Kasba-Chinchwad By-Election : राज्याचे राजकारण सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीरुन तापले आहे.
Asim Sarode, Supreme Court
Asim Sarode, Supreme CourtSarkarnama

Asim Sarode News : राज्याचे राजकारण सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीरुन तापले आहे. निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झाला आहे. मात्र, अशातच घटनातज्ज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी मोठे विधान केले आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीसंदर्भात बोलताना असीम सरोदे म्हणाले की ''चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. कारण शिवसेने (Shivsena) संदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामध्ये जर १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होईल. विधानसभा भंग झाली तर मग निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही''

Asim Sarode, Supreme Court
Balasaheb Thorat News : नाराजी बाजूला ठेऊन थोरात काँग्रेससाठी झटणार; थेट कसब्यात सभा...

''कारण आताची ही पोटनिवडणूक १४ व्या विधानसभेसाठी होणार आहे. १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन राष्ट्रपती राजवट येईल. त्यामुळे मग या निवडणुकांना काहीच अर्थ उरत नाही,'' असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या विधानसभा पोटनिवडणुकींचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

दरम्यान, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी स्टार प्रचारक आणि प्रभारींच्या नेमणुकाही केलेल्या आहेत. त्यामुळे असीम सरोदे यांच्या विधानामुळे नक्कीच उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. आता सर्वोच्च न्यायालयात काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Asim Sarode, Supreme Court
Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांच्या वरळीतील फसलेल्या सभेला जबाबदार कोण?

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येई पर्यंत निकाल देऊ नये, अशी भूमिका मांडली. त्यावरही सरोदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात जर १६ आमदार अपात्र ठरले तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर परीनाम होईल, त्यामुळे आयोगाने निर्णयाची घाई करु नये, असेही सरोदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com