Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama

अशोक चव्हाणांची नाराजी दूर होणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद देणार?

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, पल्लम राजू यांना भेटून ही मागणी केली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) प्रवेशाची चर्चा होत असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडे काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, पल्लम राजू यांना भेटून केली आहे. त्यामुळे येत्या काळात चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याची प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून होण्याची चिन्हे आहेत. (Ashok Chavan will get the post of state president of Congress?)

मुंबईत सोमवारी काँग्रेस प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड व्हावी, असा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधीमंडळातील पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी त्याला अनुमोदन दिले. मात्र, याच बैठकीत ठराव मांडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी समर्थन करण्यासाठी हात वर केला नाही, असे सांगण्यात येत आहे.

Ashok Chavan
काही काळजी करू नका; सगळं काही ओक्के होईल : राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक राजकीय भाष्य

दुसरीकडे, माजी मंत्री अशोक चव्हाण हेही पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गणेशोत्सवात झालेली भेटही चांगलीच गाजली होती. याशिवाय नांदेडमधील एका कार्यक्रमातही हे दोघे एकत्र आले होते. त्यामुळे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू आहे.

Ashok Chavan
मुक्ताईनगरमध्ये शिंदे-महाजन करणार खडसेंवर हल्लाबोल; एकाच विमानातून जळगावात येणार

दरम्यान, अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा प्रदेशध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात यावी, अशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरू आहे. माजी मंत्री चव्हाण पक्ष सोडून जाण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षात थांबविण्यासाठी ही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात यावी, अशी मागणी खुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Ashok Chavan
अभिजित पाटलांचा पवारांसोबत यवतपर्यंत एकाच गाडीतून प्रवास; राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा

नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी नाराज असल्याची चर्चा आहे. पटोले यांनी पक्षवाढीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत,असा आरोपही त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे पटोले यांना बदलून ते पद अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात यावे, अशी चर्चा काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com