शेलारांचा मोठा धमाका : 2017 मध्येच भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती...

आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या गोप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शेलारांचा मोठा धमाका : 2017 मध्येच भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती...
Ashish Shelarsarkarnama

मुंबई : राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा असते ती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीची. आजही ही चर्चा रंगते. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) यांच्यामध्ये २०१७ मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट भाजप (Bjp) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. ते एका दैनिकाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

शिवसेनेसोबतच्या (shivsena) तुटलेल्या युतीसंदर्भात शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शेलार यांनी हा गौप्यस्फोट केला. पहाटेच्या शपथविधीच्याही दोन वर्ष आधी म्हणजे २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणी झाली होती, असे शेलार यांनी सांगितले. शेलार यावेळी म्हणाले, भाजपला २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी अस वाटू लागले होते. कारण शिवसेनेचे रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी, त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप असे सरकार करावे, अशी चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये पालकमंत्री देखील ठरले होते. त्यानंतर पुन्हा भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ठरवले की आपण तीन पक्षांचे सरकार स्थापन करु, असे शेलार यांनी सांगितले.

Ashish Shelar
संजय पांडे शिवसेनेत प्रवेश करणार का? अखेर राऊतांनीच दिलं उत्तर

२०१७ मध्ये राष्ट्रवादीने युती करायला नकार दिल्याचे शेलार यावेळी म्हणाले. आम्ही तेव्हा म्हटले होते तीन पक्षांचे म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे सरकार करु. त्यावेळी राष्ट्रवादीने याला नकार दिला. शिवसेनेशी आमचे जमूच शकत नाही, असे राष्ट्रवादीने सांगितले होते. राष्ट्रवादी, भाजपसोबत येत असताना भाजपने शिवसेनेला सोडले नाही. मात्र, २०१९ ला सत्ता दिसल्यावर शिवसेनेने भाजपला सोडायची भूमिका सहज घेतली, असेही शेलार म्हणाले.

Ashish Shelar
युसूफ लकडावालांचे पवार, राऊत अन् मातोश्रींशी संबंध; कंबोज यांचा आरोप

शेलार यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादीने ज्या शिवसेनेसोबत जमूच शकत नाही असे २०१७ मध्ये म्हटले होते, त्यांनी आता शिवसेनेशी अशी सलगी केली की जत्रेतले दोन भाऊ हरवले होते असे वाटावे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका किती महिन्यात किती वर्षात बदलते याची साक्षीदार भाजप आहे, असा टोला शेलार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.