Devendra Fadnavis : बदला घेण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचे पुन्हा मोठे विधान...

अवकाळी पाऊस हा चिंतेचा विषय आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे राहील
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : विधानसभेत मी सांगितलं होतं की, अनेक लोकांनी मला त्रास दिला आहे. त्या सगळ्यांचा मी बदला घेणार आणि माझा बदला हा आहे की, मी या सर्वांना माफ केले आहे. आम्ही पहिलेच आमच्या विरोधकांना माफ केलेले आहे, त्यामुळे आमच्या मनात आता कोणतीही कटुता नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होळीच्या दिवशी स्पष्ट केले. (Another big statement by Devendra Fadnavis about revenge)

आमच्या मित्रांना होळीच्या वेळी कोणीतरी खोट सांगून भांग पाजली हेाती. त्यानंतर दिवसभर कोणी गाणं म्हणत होतं, तर कोणी रडत होतं. ते सर्व पाहून मजा आली. पण, मी सांगण्याचा प्रयत्न केला की, अशी नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा आणि कामाचा नशा करावा, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सूचविले.

Devendra Fadnavis
Sarpanch Election : सरपंचाच्या निवडणुकीत ट्विस्ट; शिंदेगावातील दोन ग्रामपंचायत सदस्य अचानकपणे सहलीवर; कुटुंबीयाकडून अपहरणाची तक्रार

सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी

अवकाळी पाऊस हा चिंतेचा विषय आहे. तो कमी भागात झाला असला तरी त्यामुळे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे राहील, असा दिलासाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला.

Devendra Fadnavis
Solapur News : '....म्हणूनच शिंदे-फडणवीस महापालिका, झेडपीच्या निवडणुका घेण्याचे धाडस करत नाहीत'

फडणवीसांचा सल्ला नेमका कुणाला?

फडणवीस म्हणाले की, होळीच्या दिवशी मला फक्त एक दोन लोकांनाच सल्ला द्यायचा आहे. उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही ती तशी आहे. पण काही लोकं ३६५ दिवस शिमगा करतात. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की एकदा-दुसरा दिवस ठीक आहे. उरलेले ३६४ दिवस आपण सभ्य माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला, तर उत्तम होईल.

Devendra Fadnavis
Sangola Politics : गणपतराव देशमुखांच्या पट्टशिष्याला आमदारकीचे वेध; राष्ट्रवादीच्या साळुंखेंना आशीर्वादासाठी घातले साकडे

अर्थसंकल्प सर्वसमावेशक असेल

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा. होळी आणि रंगपंचमी हे अशा प्रकारचं पर्व आहे. ज्यावेळी आपण होलिका देवीच्या ज्वालारमध्ये जे जे वाईट आहे, ते टाकून जाळून देतो. दुसरीकडे रंगोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांना एकमेकांच्या रंगातून रंगवतो आणि हे जग सप्तरंगी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. जसे होळीचे रंग आहेत, तसेच आमच्या बजेटचे वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतील. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपल्याला पहायला मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in