अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा , भावी पत्नी आहे डाॅक्टर!

संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर नाव घेऊन दगाबाजीचा आरोप केला होता, त्यात देवेंद्र भुयार यांचे देखील नाव होते. ( Amravati District)
Independent Mla Devendra Bhuyar
Independent Mla Devendra BhuyarSarkarnama

अमरावती : विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत आपल्या एका मताच्या जोरावर संजय राऊतांना भिडणारे आणि अजितदादा सांगतील ती पूर्व दिशा असे ठणकावून सांगणारे (Amravati) अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांचा साखरपुडा झाला आहे. त्यांच्या भावी पत्नी या डाॅक्टर असून लवकरच हे दोघेही बोहल्यावर चढणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य ते अपक्ष आमदार अशी राजकीय झेप घेणारे भुयार सध्याच्या राजकीय धुळवडीपासून दूर आहेत.

साखरपुरडा झाल्यानंतर ते आता विधानसभेत ठाकरे सरकारला पाठिंबा देण्यासाठी तीस जून रोजी उपस्थित राहणार का, याची उत्सुकता आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांचा 2019 च्या निवडणुकीत पराभव केल्यानंतर भुयार राज्यात चर्चेत आले होते.

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आले होते. (Vidharbha) शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव होऊन भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे आश्चर्यकारकरित्या विजयी झाले होते. या पराभवाने शिवसेना चांगलीच संतापली होती.

तेव्हा संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर नाव घेऊन दगाबाजीचा आरोप केला होता, त्यात देवेंद्र भुयार यांचे देखील नाव होते. तेच आमदार देवेंद्र भूयार यांचा आज साखरपुडा संपन्न झाला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथील मोनिका राणे यांच्याशी आज नातेवाईक, आप्तेशष्ठांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साखरपुडा संपन्न झाला.

Independent Mla Devendra Bhuyar
शिवसेनेनंतर फडणविसांचा राष्ट्रवादीला दणका; श्यामसुंदर शिंदे `सागर`किनारे

देवेंद्र भुयार यांच्या भावी पत्नी मोनिका यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेले आहे. आता आमदार देवेंद्र भूयार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com