Sarkarnama Exclusive : अमित शहांची शिंदे-फडणवीस सरकारवर करडी नजर; तीन मंत्र्यांना कामाबाबत विचारला खरमरीत शब्दांत जाब

आता हे तीन मंत्री कोण?, असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जात आहे.
Amit Shah-Eknath shah-Devendra Fadnavis
Amit Shah-Eknath shah-Devendra FadnavisSarkarnama

नवी दिल्ली : राज्यात सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर भाजपश्रेष्ठींची करडी नजर असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे सरकारच्या कामकाजावर दिल्लीतून बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यातूनच त्यांनी राज्यातील तीन मंत्र्यांना आपल्या कामकाजाबाबत खरमरीत शब्दांत तब्बल ६७ प्रश्न विचारल्याची माहिती ‘सरकारनामा’च्या सूत्रांना मिळाली आहे. आता हे तीन मंत्री (ministers) कोण?, असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जात आहे. (Amit Shah's close eye on Shinde-Fadnavis government; upset with the work of three ministers)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. या सरकारला सत्तेवर येऊन येत्या ३० जानेवारी रोजी सात महिने पूर्ण होत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आणखी संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात यायचे आहे. तोवरच्या सरकारमधील काही मंत्र्यांच्या कामाबाबत तक्रारीचा सूर दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे.

Amit Shah-Eknath shah-Devendra Fadnavis
Indapur NCP : इंदापुरात राष्ट्रवादीला धक्का ; वरिष्ठ नेत्याने धरला शिंदे गटाचा रस्ता

शिंदे-फडणवीस सरकारचे गॉडफादर मानले जात असलेले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची या सरकारवर स्थापनेपासूनच करडी नजर आहे. त्यातूनच ते राज्यातील तीन मंत्र्यांच्या कामकाजावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. गृहमंत्रालयाची सूत्रे, मतदारसंघातून आलेले फीडबॅक आणि पक्षाच्या यंत्रणेकडून मिळणारी माहिती आणि काही तक्रारी यावरून शहा यांनी या तीन मंत्र्यांना कामकाजाबाबत काही प्रश्न विचारले आहेत. या तीन मंत्र्यांना अमित शहा यांनी पाच ते सहा दिवसांपूर्वी तब्बल ६७ प्रश्न विचारले आहेत.

Amit Shah-Eknath shah-Devendra Fadnavis
Daund Mass Murder Case : चिमुकल्यांचे मृतदेह पाहून अग्निशमन पथकही हेलावले

राज्याच्या वेगवेगळ्या भागातील हे तीन मंत्री आहेत. त्यांनी दिलेल्या उत्तराने गृहमंत्री शहा यांचे समाधान होते की कारवाईचा बडगा उगारतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. या तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून एवढ्यात डच्चू मिळण्याची शक्यता कमी असली तरी त्यांचे डिमोशन हेाऊ शकते. मंत्रिमंडळाच्या विस्तारात या तीन मंत्र्यांकडे असणारी खाती काढून घेऊन त्यांच्याकडे इतर कमी महत्वाची खाती सोपवली जाऊ शकतात किंवा त्यांच्याकडे सध्या असलेली खातीही कमी केली जाऊ शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com