एकनाथ शिंदेंच्या बंडामागे अमित शहा?; दिल्लीतील बैठकीनंतर सूत्रे हलली

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खळबळ माजलेली असतानाच काँग्रेसमधील काही आमदार फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Amit Saha News, Eknath Shinde News, Political Crisis in Maharashtra News
Amit Saha News, Eknath Shinde News, Political Crisis in Maharashtra NewsSarkarnama

मुंबई : नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिंदे यांची गुजरातमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली ते चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) (सी. आर. पाटील) यांची दिल्लीत अमित शहा यांच्याशी सोमवारी बैठक झाल्यानंतरच या सर्व घडामोडींनी वेग घेतल्याचे सांगितले जात आहे. (Amit Shah behind Eknath Shinde's rebellion?)

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे विश्वासू म्हणून सी. आर. पाटील यांची ओळख आहे. नवी दिल्लीतून त्यांना दोन दिवसांपूर्वीच सूरतला पाठविण्यात आले होते. सूरतमध्ये येण्यापूर्वी त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीनंतरच शिवसेनेतील हालचाली वाढल्या आणि शिंदे यांनी गुजरातकडे कूच केली. या बंडानंतर पाटील व शहा यांच्यात सातत्याने संपर्क सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Eknath Shinde Latets News)

Amit Saha News, Eknath Shinde News, Political Crisis in Maharashtra News
एकमेव आमदार शहाजी पाटलांच्या बंडामुळे सोलापूर शिवसेनेत खळबळ!

सूरत हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी नगरपालिकेसह सर्वच ठिकाणी भाजपची सत्ता आहे, त्यामुळे शिंदे यांच्यासाठी सूरत शहर निवडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खळबळ माजलेली असतानाच काँग्रेसमधील काही आमदार फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण, काँग्रेसचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून त्यांच्यासाठी सूरतमधील मेरीएट (जुनी ग्रँण्ट भगवती) हॉटेलमध्ये सूट राखीव ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Political Crisis in Maharashtra News)

Amit Saha News, Eknath Shinde News, Political Crisis in Maharashtra News
शिंदे सुरतमार्गेच भाजपमध्ये जाणार? गायब आमदारांच्या नावांची यादी 'गुजराती'मध्ये व्हायरल

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातून येणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांची सर्व व्यवस्था सी. आर. पाटील यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. त्यानंतर पाटील यांनी सोमवारी (२० जून) सायंकाळी सूरतमधील मेरिएट हॉटेलमध्ये व्हीआयपी सूट बुक करून ठेवले आहेत. शिवसेनेचे १६ आमदार मुंबईहून रात्री दहाच्या सूरतकडे रवाना झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे रात्री दीड वाजता सूरतला गेल्याचे सांगितले जात आहे.

Amit Saha News, Eknath Shinde News, Political Crisis in Maharashtra News
एकनाथ शिंदेंशी संपर्क झाला, चंद्रकांत पाटील यांनीच सगळी व्यवस्था केलीय! संजय राऊतांचं मोठं विधान

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेलेल आमदार मेरीएट हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या नावाने रुम बुक करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि सी. आर. पाटील यांची आज पहाटे भेट झाली आहे. या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना दूर ठेवण्यात आले होते . या दोघांनी एकत्र चहा घेतल्यानंतर शिंदे आणि पाटील हे एकाच मोटारीतून गेले. त्यांच्या पाठोपाठ आमदारही मेरिएट हॉटेलमध्ये गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com