बंगल्यांचे वाटप : विखे-पाटलांना रॉयलस्टोन, राठोड मुख्यमंत्र्यांचे शेजारी, बहुचर्चित रामटेक केसरकरांच्या वाट्याला!

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगला देण्यात आला आहे.
Rahul Narvekar, Radhakrishna Vikhe Patil, Deepak Kesarkar, Chandrakant Patil
Rahul Narvekar, Radhakrishna Vikhe Patil, Deepak Kesarkar, Chandrakant PatilSarkarnama

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारास ४० दिवस लावणारे एकनाथ शिंदे (Eknath shinde)-देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) सरकारने (Government) काही महत्वाचे व्यक्ती आणि मंत्र्यांना बंगल्याचे वाटप केले आहे. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना शिवगिरी बंगला देण्यात आला आहे, तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे रॉयलस्टोन बंगल्यात राहणार आहेत. रामटेक या बंगल्यात वास्तव्यास गेलेल्या मंत्र्याला नंतर फारसे चांगले खाते मिळत नाही, मंत्रीपद जाते. आरोपांचा ससेमिरा मागे लागतो, असे मानले जाते. तो रामटेक बंगला शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या वाट्याला आला आहे. (Allotment of bungalows to ministers by Eknath Shinde-Devendra Fadnavis government)

अधिवेशनाचा कालावधी संपताच संबंधित मंत्री त्यांना मिळालेल्या निवासस्थानी रहायला जातील. अन्य मंत्र्यांनाही लवकरच घरे मिळतील. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी काही घरांचे सुशोभीकरण केले होते, त्या घरांना नव्या सरकारमधील मंत्र्यांकडून पसंती दिली जात आहे.

Rahul Narvekar, Radhakrishna Vikhe Patil, Deepak Kesarkar, Chandrakant Patil
सोमवारी उशिरापर्यंत यादी नसणारे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण असे आले सुनावणीला

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाट्याला पर्णकुटी हा बंगला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना लोहगड, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना चित्रकूट, तर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना सेवासदन, तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन, तर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा शेजारचा शिवनेरी हा बंगला संजय राठोड यांना देण्यात आला आहे.

Rahul Narvekar, Radhakrishna Vikhe Patil, Deepak Kesarkar, Chandrakant Patil
शिंदे सरकारच्या भवितव्याची सुनावणी घटनापीठासमोर; पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगास निर्देश

ज्ञानेश्वर बंगला हा सुरेश खाडे यांना, संदीपान भुमरे यांना, ब2 रत्नसिंधु, उदय सामंत यांच्या वाट्याला मुक्तगिरी बंगला आला आहे. रायगड हा बंगला रवींद्र चव्हाण यांना, अब्दुल सत्तार यांना पन्हाळगड मिळाला आहे. शिवगड हा बंगला अतुल सावे यांना, शंभूराज देसाई यांना पावनगड, तर मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना सिंहगड हा बंगला देण्यात आलेला आहे.

Rahul Narvekar, Radhakrishna Vikhe Patil, Deepak Kesarkar, Chandrakant Patil
भाजप दोन महिलांना देणार मंत्रिपदाची संधी; माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे यांची नावे आघाडीवर

दरम्यान, उर्वरीत मंत्र्यांनाही लवकरच बंगल्याचे वाटप करण्यात येणार आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर हे सर्व मंत्री नव्या बंगल्यात राहायला जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com