Loksabha Election: महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभेसाठी काँग्रेसने मांडला जागावाटपाचा ‘हा’ फॉर्म्युला

Maha Vikas Aghadi Meeting: महाविकास आघाडी एकत्र लढत असल्याचा संदेश त्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात द्यावा.
Mahavikas Aghadi Meeting
Mahavikas Aghadi MeetingSarkarnama

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली असून तीनही पक्षांनी समसमान म्हणजे १६ जागा प्रत्येकी तीन पक्षांनी लढवाव्यात, अशी आग्रही भूमिका मांडली आहे. याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. (All three parties should contest 16 seats each in Lok Sabha : Congress proposed formula)

कर्नाटकात काँग्रेसचा (Congress) विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास दुणावला आहे. निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी आपल्या निवास स्थानी तीनही पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली हेाती. कर्नाटकातील विजयामुळे बूस्टर मिळालेल्या काँग्रेस नेत्यांनी जागावाटपासंदर्भात चर्चा करताना समसमान जागांचे सूत्र मांडले आहेत. त्याला तीन पक्षांकडून काय प्रतिसाद मिळाला, हे समजू शकलेले नाही. मात्र, काँग्रेस त्यावर आग्रही आहे.

Mahavikas Aghadi Meeting
Karnataka Next CM : सिद्धरामय्या कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री? : शुभेच्छा देत शिवकुमार म्हणाले ‘मी बंडखोर नाही अन्‌ ब्लॅकमेलही करत नाही’

एकत्र लढायचे असेल तर समसमान जागा वाटप व्हावे. महाविकास आघाडी एकत्र लढत असल्याचा संदेश त्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात द्यावा. आता जरी आमचा एकच खासदार महाराष्ट्रात असला तरी समसमान जागावाटप करून आपण एकत्र असल्याचे दाखवून द्यावे. सर्वांना समान जागावाटप करून त्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून येतील. एक-दोन जागांसंदर्भात तडजोड करण्याबाबत तीनही पक्षांनी तयार राहावे, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने या बैठकीत मांडली आहे.

Mahavikas Aghadi Meeting
Karnatka BJP MLA : अबब! कर्नाटक भाजप आमदाराच्या घरातून सहा कोटी जप्त

यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जागा वाटपासंदर्भातील ही प्राथमिक बोलणी आहे. त्यावर पुढे अजून कोणतीही चर्चा झालेले नाही. बैठकीला काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, नसीम खान, तर शिवसेनेकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com