सभेत दारुड्याची एन्ट्री होताच अजितदादा भाषण थांबवून म्हणाले, ‘तू नंतर येऊन भेट मला’!

इंदापूर तालुक्याच्या लाखेवाडी येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी एका दारूड्याने दादा... दादा... म्हणत एन्ट्री केली.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

इंदापूर : इंदापूर तालुक्याच्या लाखेवाडी येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणावेळी एका दारूड्याने दादा... दादा... म्हणत एन्ट्री केली. त्यानंतर अजितदादांनी आपले भाषण थांबवत ‘हा गडी दुपारीच चंद्रावर गेलाय...ह्याला काय हाय का नाही...’ असे त्याला सुनावत त्याला ‘तू नंतर येऊन भेट मला, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सभेतील दारुड्याची एन्ट्रीची इंदापुरात चांगलीच चर्चा रंगली होती. (Alcoholist entry in Ajit Pawar's meeting in Indapur)

भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, राणी आढाव, युवक नेते दीपक जाधव, माजी सभापती स्वाती शेंडे, बापूराव शेंडे व त्यांच्या समर्थकांनी आज (ता. ३ एप्रिल) शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना वरील किस्सा घडला.

Ajit Pawar
अजित पवार वाढवणार हर्षवर्धन पाटलांचे टेन्शन; चौकशी लावण्याचे दिले संकेत

अजित पवार यांचे भाषण ऐन रंगात आले असतानाच एका दारुड्याने सभेत प्रवेश केला. तो येताना दादा...दादा...अशा हाका मारत होता. ते ऐकून अजित पवारांनी आपले भाषण थांबवले. त्यानंतर आपल्या खास शैलीत त्याचा अजितदादांनी समाचार घेतला. ते म्हणाले, हा गडी तर दुपारीच गेलाय चंद्रावर...याला काय हाय का नाही..? पुढे ते म्हणाले की, ‘जरा बस... बस खाली बस....’ कार्यकर्त्याला उद्देशून ‘त्याला पाणी द्या रे प्यायला जरा,’ अशी सूचना केली. त्यानंतर मित्राने जाऊद्या. आता आपल्याला पवारसाहेबांचे भाषण ऐकायचे आहे. असली लोकं दादा...दादा...करायला लागली की माझा मूडच जातो, असे म्हणून अजित पवारांनी शेवटी त्या दारूड्याला ‘तू नंतर येऊन भेट मला. काही काळजी करू नको,’ असेही सूचविले.

Ajit Pawar
बनवाबनवीमुळेच बाबाला भरणेमामांनी दोनदा चितपट केले : अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर हल्लाबोल

आम्ही लाखांनी निवडून येतो आणि हे इंदापुरात पडतात

याच भाषणात अजित पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा चांगलाचा समाचार घेतला. पूर्वीच्या निवडणुकीत सूत गिरणी काढण्याची हूल दिली. निवडणुकीनंतर सूतगिरणीचं नावही काढलं गेलं नाही. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना इंडस्ट्रीज काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मातीमोल किमतीने जमीन दिल्या. पैसे गोळा करण्यात आले. पण, तिथं आज कुसळाशिवाय काही दिसत नाही. लोकांना किती बनवाल? अशा बनवाबनवीमुळेच राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बाबाला दोनदा कधी चितपट केले, हे कळलंच नाही. ही बनवाबनवी केली नसती तर हे घडलं नसतं. आम्ही कधी बनवाबनवी करत नाही, त्यामुळेच सव्वा लाखाने निवडून येतो आणि हे मात्र इंदापुरात पडतात, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com