अजितदादा सरकारी विमानाने जयपूरला गेले.. एकनाथ शिंदे, आदित्य वाट पाहत बसले

प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांच्या घरी साजऱ्या होत असलेल्या विवाहसोहळ्यांसाठी नेत्यांची गडबड
Ajit Pawar-Eknath Shinde

Ajit Pawar-Eknath Shinde

Sarkarnama 

मुंबई : महाराष्ट्रातल्या नेत्यांकडे सध्या लग्नोत्सव सुरु आहे. लग्न घरच्याघरी उरकून थाटामाटाचे स्वागतसमारंभ बाहेरच्या राज्यात साजरे करण्याचा ट्रेंड आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी विमानवाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या मुलाचे लग्न जयपुरात आज आहे. या लग्नाला राज्यातील अनेक नेत्यांना जायचे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अद्याप प्रवासाला बाहेर पडत नसल्याने प्रफुल्लभाईंकडच्या लग्नाला त्यांचे पुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेतले सर्वात शक्तीशाली मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धवजींचे खास सहकारी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंंत्र्याचे प्रतिनिधी म्हणून तिकडे जाणार होते. हे तिघे जयपूरला प्रफुल्लभाईंकडच्या लग्नाला हजेरी लावून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा हिच्या ठाण्यात साधेपणाने झालेल्या पण गोव्याच्या भूमीत समारंभपूर्वक साजाऱ्या होणाऱ्या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खाशा स्वाऱ्यांचा हा प्रवास शासकीय विमानाने होईल असे अधिकार्यांनी गृहित धरले होते. प्रत्यक्षात घडले भलतेच.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar-Eknath Shinde</p></div>
मी मूक प्रेक्षक बनून स्वस्थ बसणार नाही : अमित शहांचा महाविकास आघाडीला थेट इशारा

मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला असलेले विमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आधीच उडवले होते. सेनेच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये राष्ट्रवादी वरचढ असल्याची उक्ती सार्थ ठरवत उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि अन्य दोन आपल्याच पक्षातल्या मंत्र्यांना समवेत घेवून जयपूरला निघालेही होते. आघाडीचे सरकार असले तरी तुम्हा कुणाला यायचे आहे का बरोबर, अशी विचारणाही कुठे केली गेली किंवा मैत्रीच्या पातळीवरही तशी विनंती झाली नाही, असे म्हणतात. मुख्यमंत्र्यांचे ते विमान घेवूनच राष्ट्रवादीची मंडळी गोव्याला आव्हाड कुटुंबियांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar-Eknath Shinde</p></div>
महाराष्ट्रात तीनच जिल्हा बॅंका सुस्थितीत, असे का झाले : अमित शहांचा सवाल

शासकीय विमान तर गेले. राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांकडे जायला तर हवे. या भावनेने सेनेच्या बडया स्वार्यांनी खाजगी चार्टर्ड विमान बोलावायचे ठरवले. भाडे भरायची तयारी होती पण विमानेही उपलब्ध नव्हती. अखेर दिल्लीच्या एका विमान कंपनीला गाठून चार्टर्ड फ्लाईट दाखल झाले. सत्तेचे पहिल्या क्रमांकाचे भोई असलेले सेनेचे मंत्री पैसे भरून लग्नाला गेले याची चर्चा सुरु आहे.

राज्यपालांना सरकारी विमान मिळणार नाही याची मध्यंतरात चर्चा झाली होती. आता विमान मुख्यमंत्री नसतील तर उपमुख्यमंत्र्यांना मिळते असा नियम आहे काय याची चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com