ऐकून तर घे ना शहाण्या...राजन पाटलांसाठी मी साहेबांशी बोलेन..!

मतदारसंघाची फेररचना झाली, काही ठिकाणी आरक्षण पडलं. त्यात मोहोळ मतदारसंघाचा समावेश झाला, त्यामुळे राजन पाटील यांच्यासाख्या चांगल्या नेत्याला थांबावे लागले.
ऐकून तर घे ना शहाण्या...राजन पाटलांसाठी मी साहेबांशी बोलेन..!
Rajan Patil-Ajit PawarSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : ‘‘माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांना या ठिकाणी संधी देता येत नसली (मोहोळ मतदारसंघ आरक्षित असल्यामुळे उमेदवारी देता येत नाही) तरी (तेवढ्यात खालून एका कार्यकर्त्याने राजन पाटलांच्या पुनर्वसनाची मागणी केली. त्याला अजित पवारांनी ‘ऐकून तर घे ना शहाण्या’ म्हणत फटकारले) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करून दुसरीकडे वेगळी संधी देण्याबाबत मी निश्चितपणे लक्ष देईन, याबाबतची खात्री मी तुम्हाला देतो,’’ असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनगरच्या सभेत दिला. (Ajit Pawar promised to give a chance to Rajan Patil by discussing with Sharad Pawar)

मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नगरपंचायत झाल्याबद्दल आज (ता. ३० एप्रिल) कृतज्ञता आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन अनगरमध्ये करण्यात आले होते. त्या मेळाव्यात बोलताना मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या समोर अजित पवारांनी राजन पाटील यांना राजकीय संधी देण्याबाबत जाहीरपणे सूतोवाच केले.

Rajan Patil-Ajit Pawar
सोलापूर जिल्हा बॅंक चालवायला मी अन्‌ शरद पवारांनी यायचं का? : अजितदादांनी सुनावले

ते म्हणाले की, मतदारसंघाची फेररचना झाली, काही ठिकाणी आरक्षण पडलं. त्यात मोहोळ मतदारसंघाचा समावेश झाला, त्यामुळे राजन पाटील यांच्यासाख्या चांगल्या नेत्याला थांबावे लागले. या ठिकाणाहून तुम्ही इंदापूरच्या पण मूळच्या मोहोळ तालुक्यातील यशवंत माने यांना आमदार केले. राजन पाटील यांना संधी देण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, याबाबतची खात्री मी तुम्हाला देतो.मोहोळचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन : अजितदादांचा राजन पाटलांना शब्द!

Rajan Patil-Ajit Pawar
राज ठाकरेंच्या ताफ्याला दुसऱ्यांदा अपघात; पुणे शहराध्यक्ष बाबरांच्या गाडीचा समावेश

राज्य सरकारने मदत केली नसती, तर भाजपच्या धनंजय महाडिकांचा पंढरपूर तालुक्यातील भीमा साखर कारखाना बंद पडला असता. तसेच कल्याण काळे यांच्या कारखान्याला मदत करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना जे हवाय ते नियमांच्या चौकटीत बसवून देण्याची आमची तयारी आहे. त्याबद्दल काळजी करू नका. आपण सर्वजण एकच आहोत, हे कायम मनाशी बाळगा. काही जण स्वतः काही करायचं नाही, स्वतःच्या बॅंका आणि कारखाना नीट चालवायच्या नाहीत. पण, दुसऱ्यावर टीका करतात. मी चांगलं काम करून दाखवलं; म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो तर ठोकून बोलतो. तसेच काम इतरांनाही करावं, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्या पाठीशी मी सरकार उभं करायला तयार आहे. आर्थिक ताकद द्यायला तयार आहे. पण, काम त्याच दर्जाचे झाले पाहिजे, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.

Rajan Patil-Ajit Pawar
मोहोळचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन : अजितदादांचा राजन पाटलांना शब्द!

पिण्याच्या पाणी योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा निधी आहे. सोलापूर जिल्हातील पाणी पुरवठ्याच्या योजनांचे प्रस्ताव आणा, ते मंजूर करून देण्याचे काम करतो. पण, योजना दर्जेदार व्हायला हवी. तसेच, वीजबिल भरण्याचीही तयार ठेवा. नाही तर योजना झाली आणि लगेच वीज कनेक्शन तोडले, असे व्हायला नको, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.