Ajit Pawar targeted Bharat Gogawle: ‘ते भरत गोगावले माझ्याकडून बघून सारख्या मिशा पिळत असतात’

मंत्रीपदावरून गोगावले यांना लक्ष्य करताना अजित पवार यांनी मी जगात कुठेही असलो तरी भरत गोगावले यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीला येणार आहे,’ असे विधान केले होते.
Ajit Pawar-Bharat Gogawle
Ajit Pawar-Bharat GogawleSarkarnama

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) यांना मंत्रीपदावरून लक्ष्य केले. तसेच, मंत्रिमंडळातील महिलांच्या सहभागावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावले. (Ajit Pawar once again targeted Bharat Gogawle over the ministerial post)

हिवाळी अधिवेशनातील आजच दिवस विधानसभेत चिमटे, टोमणे, आव्हाने आणि प्रतिआव्हानांनी गाजला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारलेल्या टोमण्यांना अजित पवार यांनी उत्तर देताचा जोरदार चिमटे काढले. त्यामुळे सत्ताधारी बाकांवरील आमदारांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होत, तर विरोध बाक वाजवून प्रतिसाद देत होते.

Ajit Pawar-Bharat Gogawle
Assembly Eession : चिमटे, आव्हान-प्रतिआव्हानांमुळे विधानसभेत रंगली खुमासदार जुगलबंदी!

फडणवीसांच्या भाषणाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, अडचणीचे विषय देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात एकदम बाजूला टाकले. कसं काय बोलावं आणि कुठल्या विषयाला साईड ट्रॅक करावं, हे तुम्हाला चांगलं जमतं. महिला मंत्र्यांच्या विषयाला तर स्पर्शही केला नाही. तेवढ्यात समोरच्या बाकावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सांगितलं ना. ते....’ असे स्पष्टीकरत देताच अजित पवार म्हणाले की सुनेत्रा पवार आणि अमृता फडणवीस यांचं नाव वेगळ्या कारणांनी घेतलं. तसलं मला नका सांगू. आमच्या मंदाताई म्हात्रे, मनीषा चौधरी या महिला आमदार लक्ष ठेवून आहेत.

Ajit Pawar-Bharat Gogawle
Devendra Fadnavis :अजित पवारांच्या भाषणातील अर्धे भाषण जयंत पाटलांचे वाटत होते : फडणवीसांचा चिमटा

आपण राज्याला घेऊन पुढे जात असतो, तेव्हा महिलांनाही प्रतिनिधीत्व दिलं पाहिजे आणि बाकीच्या मंत्रिमंडळाच्या जागा भरा. कुठल्या घ्यायच्या आहेत, त्या घ्या. पण लवकर भरा. मी तुम्हाला सांगतो की घाबरू नका. मंत्रिमंडळातील सर्व जागा भरल्या तर राहिलेले आमदार तुम्हाला सोडून निघून जातील, अशी अजिबात भीती बाळगू नका. ते अजिबात जाणार नाहीत. तुम्ही काळजीच करू नका.

Ajit Pawar-Bharat Gogawle
'अजितदादा, संधी असतानाही पवारसाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही' : फडणवीसांनी ठेवले दुखऱ्या नसेवर बोट

या वेळी बोलता बोलता अजित पवार म्हणाले की ‘आपण दोघं धरून वीसच मंत्री आहेत ना. त्यामुळे अजून २३ लोक भरण्याचा तुम्हाला अधिकार आहे.’ त्यावर सत्ताधारी बाकावरून कमेंट होताच सावध झालेले अजित पवार म्हणाले ‘मला नका, त्यात इनव्हाल करू.’ सुई कुठेतरी दुसरीकडेच सोडायची, त्यातून वेगळ्या प्रकारची चर्चा होते, त्यामुळे तुमचं तुम्ही भरा. ते आमदार भरत गोगावले माझ्याकडून बघून सारखे मिशा पिळत असतात आणि दाढी कुरवळत असतात, असं म्हणातच सभागृहात एकच हशा पिकला.

Ajit Pawar-Bharat Gogawle
पंढरपूरचा कॉरिडॉर कोणाची आमदारकी घालवणार..? कोणत्या नेत्याला आमदार करणार?

दरम्यान, मंत्रीपदावरून गोगावले यांना लक्ष्य करताना अजित पवार यांनी मी जगात कुठेही असलो तरी भरत गोगावले यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीला येणार आहे,’ असे विधान केले होते. त्यानंतर आज पुन्हा गोगावले यांची खोड पवार यांनी काढली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com