Ajit Pawar News : अजित पवारांनी सासूरवाडीच्या लोकांना दिला हा सल्ला....

बॅनर लावून कोणी मुख्यमंत्री होत नसतं
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाचे (Chief Minister) बॅनर (Banner) लागल्याचे अनेक शहरांतून दिसून आले आहे. विशेषतः पवारांच्या सासूरवाडीत धाराशिवमध्ये त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लागले होते. त्यावर आता खुद्द अजितदादांनीच भाष्य केले आहे. आमच्या सासूरवाडीतील लोकांचे माझ्यावर प्रेम उतू चालेले आहे. त्यांना माझे आवाहन आहे की, तुम्ही चुकीच्या पद्धतीची अपेक्षा व्यक्त करत आहात. पण, त्यासाठी वरिष्ठांचा आशीर्वाद आणि १४५ आमदारांचं पाठबळं लागतं. त्यामुळे असे बॅनर लावू नका. (Ajit Pawar gave this advice to the people of Sasurwadi....)

अजित पवार म्हणाले की, माझ्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर कोणीही लावू नये. आमच्या कार्यकर्त्यांकडून चुकीच्या पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे बॅनर लावून कोणी मुख्यमंत्री होत नसतं. मुख्यमंत्री होण्यासाठी संबंधित नेत्याला १४५ आमदारांचे पाठबळ मिळवावं लागतं. जे एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून मिळविले; म्हणून ते मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असे कोणालाही वाटलं नव्हतं. पण ते झाले.

Ajit Pawar
Konkan News : रत्नागिरी लोकसभा शिंदे गटाकडे : उद्योगमंत्र्यांचे बंधू असणार उमदेवार, सामंतांचे संकेत; राणेंकडे लक्ष

मी सर्वांना आवाहन करतो की, आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, हितचिंतक, माझ्या सासूरवाडीतील माझ्यावर प्रेम ऊतू जाणाऱ्या कार्यकर्त्यांनाही माझ्या नावाचे बॅनर लावू नका, असे मी सांगेन. हा तुमचा अतिशय चुकीचा आग्रह आहे. त्यातून काहीही होणार नाही. सर्वांनी आपापले काम करत राहावे. आमदारांची संख्या वाढवावी. जेवढे जास्त आमदार तुमच्या विचारांचे निवडून येतील, तेव्हाच तुम्हाला असे पद मिळायला वाव असतो. पण, त्यासाठी तुमच्या वरिष्ठांनी आशीर्वाद दिले पाहिजेत आणि १४५ आमदारांनी तुम्हाला समर्थन दिलं पाहिजे. तर तुम्हाला मुख्यमंत्री होता येतं, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Karnataka Election News: भाजप नेत्यांचा पराभव टाळण्यासाठी अमित शहा मैदानात : 10 जागांवर विशेष लक्ष

काय झाले होते तेरमध्ये?

धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे जावई असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी त्यांच्या सासरवाडीमध्ये `भावी मुख्यमंत्री` असे फलक लावण्यात आले होते. राष्ट्रवादीचे युवा नेते पृथ्वीराज आंधळे यानी हे बॅनर लावले होते. संत गोरोबाकाकांच्या मंदिरात दुग्धाभिषेक करुन अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, यासाठी साकडे घातले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com