आता माझी बायकोही म्हणेल आपण नव्यानं लग्न करू : अजितदादांची भरसभेत मिश्किली!

मला ते फोटो दाखवत प्रमोद काकडे म्हणाले ‘सुनेत्रावहिनींना दाखवलं, त्या म्हणाल्या दादांना दाखवा,’
आता माझी बायकोही म्हणेल आपण नव्यानं लग्न करू : अजितदादांची भरसभेत मिश्किली!
Ajit Pawar-Sunetra PawarSarkarnama

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : उद्योजक आर. एन. शिंदे यांनी ३५ वर्षांनी पुन्हा आपल्या पत्नीशी नव्याने लग्न केलं. मला ते फोटो दाखवत प्रमोद काकडे म्हणाले ‘सुनेत्रावहिनींना (Sunetra Pawar) दाखवलं, त्या म्हणाल्या दादांना दाखवा,’ त्यामुळं आता माझी बायकोपण म्हणेल नव्यानं लग्न करू. माझी व्हायची पंचाईत! अशी मिश्किली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. तसेच 'दत्तामामा आमच्या तालुक्याला पण निधी द्या; नाहीतर तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेच आहेत. मी तिजोरीला चाव्या लावल्या तर काय मिळणार XXX?' अशी कोटी करत हशा वसूल केला आणि गाडीही पुढे घसरू दिली नाही.

बारामती तालुक्यातील फरांदेनगर येथील समता पॅलेसचे उद्‌घाटन अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे होते. त्यावेळी अर्थमंत्री पवार यांनी आपल्या खास शैलीत भाषण केले. त्यात त्यांनी भरणेंना चिमटा घेत लग्नाबाबत मिश्किली केली.

Ajit Pawar-Sunetra Pawar
प्रचाराच्या धामधुमीत सतेज पाटलांचा झणझणीत कोल्हापुरी मिसळवर ताव!

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, भरणे हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी चांगला निधी आणला आहे. माझ्या तालुक्यात, संजय जगताप यांच्या तालुक्यातही लक्ष द्या, असे त्यांना सांगावे लागते. कारण बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. पण शेवटी तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. तिजोरीला चाव्याच लावल्या तर... अशी खुमासदार बॅटींग केल्यावर सभागृहात हशा पिकला. यानंतर आता माझी गाडी घसरायला लागली म्हणत अजित पवार यांनी वेळीच हात आखडता घेतला.

Ajit Pawar-Sunetra Pawar
'शिवसेनेच्या माजी आमदाराने आदित्य ठाकरेंचा आदेश झुगारला'

उद्योजक आर. एन. शिंदे हे आनंदी व समाधानी राहायचा स्तुत्य प्रयत्न करतात. त्यांनी लग्नाच्या पस्तीसाव्या वाढदिवशी पुन्हा पत्नीशी लग्न केले. जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी ते फोटो सुनेत्रा पवार यांना दाखविले. त्यावर पवार म्हणाले आता माझी बायको जर म्हणाली लग्न करायचं, तर अवघड व्हायचं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in