अजितदादांनी कार्यकर्त्यांनाही दुखावले नाही आणि नियमही मोडला नाही!

गर्दी टाळण्यासाठी अजित पवार वेळेआधीच पोचले कार्यक्रमस्थळी !
अजितदादांनी कार्यकर्त्यांनाही दुखावले नाही आणि नियमही मोडला नाही!

Ajit Pawar

Sarkarnama

बारामती : कोरोनाच्या (corona) निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही आज (ता. २ जानेवारी) आपल्या कार्यक्रमात अचानक बदल केले. बारामतीत (baramati) त्यांनी आज सकाळीच गर्दीच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला होता. आपल्या कार्यक्रमाला गर्दी होईल, या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नियोजित वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी जात कार्यक्रम उरकला. कार्यकर्त्यांचा आग्रह न मोडता, तो नाराज होणार नाही, याची काळजी घेत नियमांचे पालन करत अजितदादांनी गनिमी कावा करत समतोल साधण्याचा प्रयत्न केला. (Ajit Pawar arrives at the venue ahead of time to avoid crowds!)

बारामतीतील डॉ. आशिष जळक आणि डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे आज (ता. 2 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन होणार होते. राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांना 50 पेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीवर बंधने आणली आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्रमाला गर्दी होणार, हे जाणून अजित पवार तासभर अगोदरच कार्यक्रमस्थळी पोचले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हा कार्यक्रम उरकून घेतला. औपचारिकता बाजूला ठेवत डॉ. आशिष जळक यांच्या स्नेहभावामुळेच कार्यक्रमाला आल्याचे सांगून त्यांनी जळक कुटुंबीयांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar</p></div>
गृहमंत्र्यांच्या कट्टर समर्थकाकडून माझ्या कार्यकर्त्याला मारहाण : आढळरावांचा गंभीर आरोप

जळक कुटुंबीयांच्या सामाजिक योगदानाची प्रशंसा उपमुख्यमंत्री पवार यांनी केलीच. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच नियमांचे पालन करायला हवे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. अजित पवार यांनी आज सकाळीच शासकीय निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या कार्यक्रमांना गर्दी होणार असेल तर मी त्या कार्यक्रमाला जाणारच नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, स्थानिकांच्या आग्रहामुळे अजित पवार यांनी मध्यम मार्ग काढत लोक जमा होण्यापूर्वीच कार्यक्रमस्थळ गाठून कार्यक्रम पार पाडून ते झटपट निघून गेले.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar</p></div>
अंकिता पाटील-ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

एकीकडे नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि दुसरीकडे स्थानिक आणि कार्यकर्ते नाराज होऊ नयेत, अशी दुहेरी कसरत पार पाडत मध्यम मार्ग काढून अजित पवारांनी बॅलन्स साधल्याची चर्चा बारामतीत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in