एक मिनिट...शंभूराज, आपण एकत्र काम केलंय : अजित पवारांनी फटकारले

सध्या कोरडा दुष्काळ नाही, ओला दुष्काळ पडला आहे. कशाचं सांगता पाऊस चांगला झाला आहे. दुष्काळच आहे ना? ओला दुष्काळ आहे ना?
 Ajit Pawar-Shambhuraj Desai
Ajit Pawar-Shambhuraj Desai Sarkarnama

मुंबई : थांबा जरा, ऐका ना...अहो, एक मिनिट... आपण एकत्र काम केले आहे, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai). मध्ये बोलायचं नसतं. सध्या कोरडा दुष्काळ नाही, ओला दुष्काळ पडला आहे. कशाचं सांगता पाऊस चांगला झाला आहे. दुष्काळच आहे ना? ओला दुष्काळ आहे ना? अशा शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी फटकारले. (Shambhuraj Desai scolded by Ajit Pawar!)

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसरी दिवशी विरोधी पक्षनेते पवार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, या साठी जोरदार बॅटिंग केली. शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळण्यासंदर्भात भाषण करत असताना मध्ये बोलणाऱ्या शंभूराज देसाईंना अजितदादांनी झापले.

 Ajit Pawar-Shambhuraj Desai
भुजबळसाहेब, आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान : फडणवीसांच्या विधानाने चर्चेला उधाण

अजित पवार म्हणाले की, एक मिनिट...आपण एकत्र काम केले आहे, शंभूराज देसाई. मध्ये बोलायचं नसतं. पाऊस चांगला झाला आहे. सध्या कोरडा दुष्काळ नाही, ओला दुष्काळ पडला आहे. कशाचं सांगता पाऊस चांगला झाला आहे. दुष्काळच आहे ना? ओला दुष्काळ आहे ना? मी उदाहरण देत होतो. त्या काळामध्ये तुम्हालाही माहिती आहे. तुमच्याच मतदारसंघात विंग मिल उभा केल्या होत्या. त्यावेळी काहींनी यांचं पाती मोठी आहेत, ढग आडतील, असं सांगितलं होतं. काहीजण त्या ठिकाणची ती पाती तोडायलाही निघाले होते. लोकांच्या मनात कधी कधी अशा शंका येतात. त्यांना आपण समजून घ्यायचं असतं.

 Ajit Pawar-Shambhuraj Desai
शिंदे, फडणवीस, अजितदादांनाच दोन माईक का? : शेलार; पवार म्हणाले ‘आमचा एक माईक दिल्लीला जातो’

मागील काळात दुष्काळाच्या वेळी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी १६ कोटी रुपये खर्च केले होते. त्यातून काही भागात पाऊस पडला. त्यामुळे सरकारबाबत शेतकऱ्यांमध्ये एक सकारात्मक मेसेज गेला होता, असेही विरोधी पक्षनेते पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com