पाटील-परिचारकांविरोधात आता सर्वच निवडणुकांत महाडिकांचा उमेदवार असणार : महाडिकांचे आव्हान

भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांना हॅटट्रिक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
Rajan Patil-Prashant Paricharak- Dhananjay Mahadik
Rajan Patil-Prashant Paricharak- Dhananjay MahadikSarkarnama

पंढरपूर : माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) हे मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील ज्या निवडणुकांमध्ये असतील, त्या सर्वच ठिकाणी धनंजय महाडिकांचे पॅनेल अथवा उमेदवार असतील, असा गर्भित इशारा भाजप खासदार धनंजय महडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिला आहे. (Against Patil-Paricharak, Mahadiks will now have candidates in all elections : Dhananjay Mahadiks' challenge)

खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुळूज मतदान केंद्रावर आज (ता. १३ नोव्हेंबर) मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी भीमा साखर कारखान्यासह पंढरपूर-मोहोळचे पुढील राजकारण, राजन पाटील यांचा भाजप प्रवेश यावर आपली भूमिका सडेतोडपणे मांडली.

Rajan Patil-Prashant Paricharak- Dhananjay Mahadik
राजन पाटलांचा भाजप प्रवेश लटकणार..?: धनंजय महाडिकांनी घेतली ही भूमिका

महाडिक म्हणाले की, भीमा सहकारी साखर कारखान्याची दहा वर्षे सत्ता असूनही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मी सक्रीय होत नव्हतो. कारण, माझा मतदारसंघ कोल्हापूर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लढवत होतो. पण, भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ज्या पद्धतीने आमच्यावर लादली आणि खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे भविष्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुकांमध्ये आमचा सहभाग असेल.

Rajan Patil-Prashant Paricharak- Dhananjay Mahadik
'अशा लोकांमुळे आम्हाला पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल' : उमेश पाटलांचा राजन पाटलांवर हल्लाबोल

पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील ज्या ज्या निवडणुकांत प्रशांत परिचारक व राजन पाटील असतील, त्या सर्वच ठिकाणी त्यांच्या विरोधात धनंजय महाडिकांचे पॅनेल अथवा उमेदवार भविष्यात निश्चित उभे राहतील, असे आव्हान महाडिकांनी पाटील-परिचारकांना दिले.

Rajan Patil-Prashant Paricharak- Dhananjay Mahadik
पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच असतात पोरं, त्याचा आम्हाला स्वाभिमान : राजन पाटलांचे वादग्रस्त विधान

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांना हॅटट्रिक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. विरोधकांनी प्रचाराची पातळी सोडली , प्रचारातून दहशत आणि गुंडगिरीचा समर्थन केल्याने त्यांना मतदार नाकारातील आणि जनता हॅटट्रिक करण्याची संधी देईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com