Supreme Court Hearing : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आमदार अपात्रतेचा संबंधच उरत नाही : ॲड जेठमलानींचा युक्तीवाद

न झालेल्या घटनेवर ठाकरे गटाकडून युक्तीवाद करण्यात येत आहे.
Supreme Court Hearing
Supreme Court HearingSarkarnama

नवी दिल्ली : अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी आमदारांना (MLA) अगोदर अपात्र ठरवणं गरजेचे आहे. या प्रकरणात आमदारांना अपात्र ठरविण्यात आलेले नाही. त्यामुळे न झालेल्या घटनेवर ठाकरे गटाकडून युक्तीवाद करण्यात येत आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे वकील ॲड महेश जेठमलानी यांनी केला आहे. (After Uddhav Thackeray's resignation, disqualification of MLAs no longer matters: Adv Mahesh Jethmalani)

शिवसेना, निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सकाळपासून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात येत आहे. त्यादरम्यान शिंदे गटाकडून बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ जेठमलानी यांनी अपात्रतेच्या मुद्यावर ठाकरे गटाचा युक्तीवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

Supreme Court Hearing
Supreme Court Hearing : शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही : ॲड. अभिषेक मनु संघवींचा युक्तीवाद

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानांतर आयोगाचे अधिकार आणि अपात्रतेचा संबंधच उरला नाही. तसेच, स्थिर सरकार स्थापन करणं, हे राज्यपालांचं कर्तव्य आहे. सुप्रीम कोर्टाच्या रामेश्वर प्रसाद प्रकरणातून हे स्पष्ट होत आहे.

Supreme Court Hearing
Supreme Court Hearing : बहुमत नसतानाही एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केली : ॲड. नीरज कौल यांचा युक्तीवाद

दरम्याना, तत्पूर्वी शिंदे गटाची बाजू मांडताना ॲड नीरज कौल यांनी ‘व्हीप बदलल्यास सभागृह नेत्याला विचारणा करता येते. राजकीय पक्षाला विचारणा करता नाही,’ अशा शब्दांत नियमांवर बोट ठेवले.

Supreme Court Hearing
Supreme Court Hearing : शिंदे गट कोणत्या भूमिकेत निवडणूक आयोगाकडे गेला : सुप्रीम कोर्टाचा सवाल

शिवसेनेकडे बहुमत नसतानाही आमदारांच्या गटाकडून एक व्हीप काढण्यात आला. त्याच व्हीपच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकिल ॲड. नीरज किशन कौल यांनी युक्तीवादाच्या दरम्यान केला. तसेच, विधानसभा उपाध्यक्षांनी २५ जून रोजी अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर मागितलं. 'त्या' बैठकीनंतर अपात्रतेची नोटीस मिळाली. बहुमत नसताना ठाकरे गटाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून २९ जुलै रोजी बहुमत चाचणीला मान्यता देण्यात आली. त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा युक्तीवाद शिंदें गटाकडून नीरज किशन कौल यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com