निवडणूक संपली की योगी आदित्यनाथ पाहणार कंगनाची भूमिका असलेला हा चित्रपट

योगींची वैयक्तिक माहिती फारशी बाहेर येत नाही. ती त्यांनी या वेळी सांगितली.
 Yogi Adityanath
Yogi Adityanath sarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे भगवे वस्त्र घालून कारभार करणारे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी किंवा आवडीनिवडी विषयी फारशी माहिती जनसामान्यांत नाही. पण उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीच्या (UP election 2022) निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एक-दोन आवडी शेअर केल्या आहेत.

आपली मुख्य लढाई ही समाजवादी पक्षाशी असल्याचे सांगत 2017 पेक्षाही अधिक जागा घेऊन जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्याबद्दल भाजपने नरमाईचे धोरण स्वीकारले असल्याच्या मुद्यावर ते म्हणाले की विनाकारण कोणावर टीका करण्याचा भाजपची भूमिका नाही. त्यामुळे मायावतींना विनाकारण आम्ही लक्ष्य करत नाही. माझ्या कारकिर्दीत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याला सर्वाधिक महत्व दिले गेले. राज्यातील तरुण बिनधास्तपणे फिरू लागल्या, हा त्याचाच परिणाम असल्याचा दावा आहे. भाजपने आतापर्यंत कधीच न जिंकलेल्या 70 जागांवर आपण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातील 65 ते 70 टक्के जागा आपण जिंकू असेही त्यांनी या वेळी सांगितले. एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांच्याशी आपली कधीच भेट झाली नसल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

 Yogi Adityanath
अखेर ठरलं! अयोध्या अन् मथुरेकडे पाठ फिरवून योगी सुरक्षित मतदारसंघात!

`लल्लनटाॅप`ला दिलेल्या मुलाखतीत झालेली काही प्रश्नोत्तरे पुढीलप्रमाणे

-मोकळ्या वेळेत काय करता?

-भजन ऐकत असतो

-चित्रपट पाहता की नाही?

-फारसे पाहत नाही

-तुम्ही तर लखनौमध्ये चित्रनगरी उभारणार आहात. त्यासाठी भेटण्यात येणाऱ्या नटनट्यांविषयी तुम्हाला माहिती असते का?

-मी त्या लोकांशी चित्रपट उद्योगाबद्दलच बोलत असतो. त्यांची वैयक्तिक माहिती फारशी ठेवत नाही. जे येतात त्यांनाच विचारत असतो की तुम्ही कोणता चित्रपट बनवणार आहेत?

 Yogi Adityanath
UP Election 2022 : अखिलेश यादव यांनी केली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा

-तुमची आवडती नटी कोण?

-कंगना राणावत

-ती का आवडते?

-देशहिताच्या अनेक प्रश्नांवर धाडसीपणे बोलते.

-तिच्या बोलण्यामुळे अनेक वाद निर्माण होतात...

-जो चांगले बोलतो त्याच्याबद्दल तर वाद होणारच ना!

-तिचा कोणता चित्रपट पाहिला आहे का?

-अद्याप नाही. पण पाहणार आहे. निवडणुकीची धामधूम संपली की तिचा एक चित्रपट पाहणार आहे. त्यात तिने चांगली भूमिका केली आहे. अयोध्येवर पण तिने चांगला चित्रपट बनवला होता.

-कोणता चित्रपट पाहणार आहात?

-तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावरील चित्रपट तिने काढला आहे. तो मला पाहायचा आहे. त्याचा ट्रेलर मी पाहिलाय.

-लखनौमध्ये चित्रपट उद्योग आणण्याच्या गोष्टी तुम्ही करताय. पण तेथे चित्रपट तयार करताना त्याचे स्क्रिप्ट आधी तुमच्या सरकारला दाखवावे लागेल का?

-तशी वेळ अजिबातच येणार नाही. पण देशाचे सन्मान वाढविणारे चित्रपट तयार व्हावेत, अशीच अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in