शिंदेंचा तिसरा अन् मोठा धक्का; भुजबळ, राणेंनंतर शिवसेनेत आजवरचा सर्वात मोठा भूकंप

Shivsena | Eknath Shinde | : भुजबळ, राणेंचे बंड सहन करुन शिवसेना पुन्हा उभी राहिली...
शिंदेंचा तिसरा अन् मोठा धक्का; भुजबळ, राणेंनंतर शिवसेनेत आजवरचा सर्वात मोठा भूकंप
Eknath Shinde | Chhagan Bhujbal | narayan Rane Sarkarnama

शिवसेना (Shivsena) पुन्हा एका फुटीच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील मोठे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तब्बल ३५ आमदारांना सोबत घेवून बंड पुकारले आहे. काल विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिंदे यांनी आमदारांसोबत गुजरातमधील सुरत येथील 'ली मेरेडियन' हे हॉटेल गाठले आहे. त्यामुळे शिवसेनेसह राजकीय गोटात सध्या मोठी खळबळ उडाली असून ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. (Eknath Shinde latest News)

मात्र शिवसेनेत झालेले हे पहिलेच बंड नाही. यापूर्वी देखील शिवसेनेने दोन बंड बघितले असून यातील पहिले बंड हे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे तर दुसरे बंड नारायण राणे (Narayan Rane) यांचे होते. १९९१ साली शिवसेनेचे जवळपास ५२ आमदार निवडून आले होते. छगन भुजबळ यांचे शिवसेनेत मोठे स्थान होते. याशिवाय त्यांचा झंझावत महाराष्ट्रभर होता. मात्र शिवसेनेत विधानसभेत जेव्हा विरोधी पक्ष नेता निवडण्याची वेळ आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळांना डावलून मनोहर जोशी यांची निवड केली असे बोलले जावू लागले. (Eknath Shinde Live Updates)

अशातच मंडल आयोगावरून भुजबळ शिवसेनेवर नाराज आहेत या बातम्या बाहेर येवू लागल्या. यानंतर एक दिवस छगन भुजबळ यांनी १८ आमदारांसह शिवसेना सोडल्याची बातमी आली. पक्षांतर बंदी कायदा कडक करण्यात आला होता मात्र भुजबळांकडे शिवसेनेचे एक तृतीयांश आमदार असल्यामुळे त्यांना शिवसेना गट ब अशी मान्यता देण्यात आली. पुढे शिवसेनेने यातील ६ आमदारांना परत आणले आणि भुजबळ यांच्यासोबत तब्बल १२ आमदारांनी शिवसेना सोडली. शिवसेनेसाठी हा पहिलाच मोठा धक्का होता.

शिवसेनेला दुसरा धक्का बसला तो नारायण राणे यांच्या रुपाने. शिवसेनेत मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर २००५ साली आपल्या समर्थक ११ आमदारांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०१७ साली काँग्रेसचा राजीनामा देवून त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन केला. कालांतराने हा पक्ष त्यांनी भाजमध्ये विलीन केला. आज घडीला नारायण राणे केंद्रात मोदी सरकारमध्ये मंत्री असून राज्यसभेचे खासदार देखील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in