गद्दारीचे कारण गुलाबराव मला बोलले होते, ते तुुम्हाला सांगू का, असे आदित्य म्हणताच...

Aditya Thackeray यांच्या धरणगाव येथील सभेला मोठी गर्दी
Aditya Thackeray
Aditya Thackeraysarkarnama

धरणगाव : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव गावातील दौऱ्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव यांचे थेट नाव घेतले नाही. पण हे बंडखोर जेव्हा सुरता गेले होते तेव्हा हितले जे लोकप्रतिनिधी होते ते माझ्यासोबत संध्याकाळी गाडीत होते. त्यांचा थोड्या वेळाने थरकाप होतो, असे म्हणत गुलाबरावांची खिल्ली उडवली. आदित्य यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रचंड गर्दी या सभेला जमली होती.

मला सांगतात फिरायला पाहिजे. तुम्ही पालकमंत्री होता तुम्ही का फिरला नाही? तुमच्या खात्याचे जे काम होते त्यासाठी मी फिरलो. तेव्हा तुम्ही कुठे होता, असा सवाल आदित्य यांनी केला. व्यासपीठावर मोठ्या आवाजात भाषणे करता, मग जायचचं होत तर समोरून छातीत खंबीर खूपसून जायचं होत. असा पाठीमागून खंजीर का खुपसला, असा सवाल त्यांनी केला.

Aditya Thackeray
गुलाबरावांना टेन्शन देणारा आदित्य ठाकरेंचा दौरा : इमारतींच्या छतावरही गर्दीच गर्दी!

हितले आमदार की गद्दार यांच गद्दारीच खर कारण त्यांनी मला `वर्षा` बंगल्यावर सांगितल. ते तुम्हाला सांगू का, असा सवाल आदित्य यांनी केला. या वाक्यावर गर्दीतून सांगा सांगा, असा पुकारा झाला. त्यावर काही गोष्टी मला बोलायच्या नाहीत, असे आदित्य म्हटल्यावरही गर्दीने सांगा सांगा, असा हट्ट धरल्यावर त्यांच्यावर काही दडपण होतं, असे आदित्य म्हणताच खालून ईडी, ईडी, असा उल्लेख झाला. गद्दारांनी सत्तेचा माज दाखवू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात शेतकरी ग्रस्त आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, या मागण्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही, राज्य सुरक्षित नाही, अशी टीका त्यांनी केली.

Aditya Thackeray
Video : गुलाबराव पाटलांचे आदित्य ठाकरेंना उत्तर

ठाकरे म्हणाले, राज्यात जे घाणेरडे राजकारण होत आहे, या राजकारणाने महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती खराब केलेली आहे वैयक्तिक स्वार्थासाठी चाळीस आमदारांनी महाराष्ट्राच्या भल्याकडे पाठ फिरवली आहे. त्यासाठी या सर्व गद्दारांना आपण सर्व मिळून धडा शिकवायचा आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

या वेळी उपस्थित नागरिकांनी श्री. ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना भरभरून दाद दिली. या वेळी सेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, आहिरे, धानोरा येथील संतोष सोनवणे, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, बांभोरी येथील हेमंत सपकाळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील, ॲड. शरद माळी, अमळनेर येथील विजय पाटील, पष्टाने येथील नाना ठाकरे,"माजी नगराध्यक्ष उषा वाघ, रचना पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विनोद रोकडे, किरण अग्निहोत्री यांनी केले तर आभार सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com