Udayan Gadakh Wedding Ceremony : शिवसेनेच्या पडझडीतही एकनिष्ठ राहणाऱ्या गडाखांच्या लग्नाला आदित्य ठाकरेंची नार्वेकरांसह हजेरी

Shivsena: शिवसेनेशी नव्याने नाते जोडणाऱ्या शंकरराव गडाख यांनी मात्र आपण शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.
Udayan Gadakh's wedding ceremony
Udayan Gadakh's wedding ceremonySarkarnama

नगर : शिवसेनेच्या (Shivsena) पडझडीच्या काळातही पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमदार शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांच्या मुलाच्या लग्नासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि आपले विश्वासू साथीदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना पाठविले होते. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वीच शिवसेनेनेशी नाते जोडलेल्या गडाखांच्या लग्नाला हजेरी लावून ठाकरेंनी आपण एकनिष्ठ असणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो, हे दाखवून दिले आहे. (Aditya Thackeray attends Shankarao Gadakh's son's wedding)

माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे नातू आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांचा विवाह सोहळा आज पार पडला. या विवाहासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.

Udayan Gadakh's wedding ceremony
Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाच्या स्थापनेपासून शिवसेनेबरोबर असणारे अनेक आमदार ठाकरे यांची साथ सोडून निघून गेले. शिवसेनेच्या जिवावर मोठे झालेल्या अनेक नेत्यांनी ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंबरोबर जाणे पसंत केले. मात्र, शिवसेनेशी नव्याने नाते जोडणाऱ्या शंकरराव गडाख यांनी मात्र आपण शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या त्या भूमिकेमुळे अनेकांना आर्श्चयाचा धक्का बसला होता. कारण, ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री होते.

Udayan Gadakh's wedding ceremony
Moreshwar Temurde : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे झोपेतच हृदयविकाराने निधन

मंत्रिपद जाणार, हे माहिती असूनही शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. तीच जाणीव ठेवून उद्धव ठाकरे यांनी शंकररावांच्या चिरंजीवाच्या लग्नाला सुपुत्राला म्हणजेच आदित्य ठाकरे आणि आपले विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना पाठविले होते. विशेष म्हणजे लग्नाहून परत जात असताना आदित्य ठाकरे यांनी यशवंतराव गडाख यांना वाकून नमस्कार केला. त्याचीही चर्चा लग्नस्थळी जमली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in