भाजप प्रवेशाचा दावा होणाऱ्या अभिजित पाटलांची पवारांसमवेत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी

काही दिवसांतच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असा जाहीर दावा आमदार प्रवीण दरेकर यांनी पंढरपुरात येऊन केला होता.
Abhijit Patil-Sharad Pawar
Abhijit Patil-Sharad PawarSarkarnama

सोलापूर : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit Patil) हे काही दिवसांतच भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करतील, असा जाहीर दावा आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी पंढरपुरात येऊन केला होता. मात्र, त्याच अभिजित पाटील यांनी आज (ता. १९ सप्टेंबर) कुर्डूवाडी येथील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. नुसतीच हजेरीच नाही तर व्यासपीठावरच पवार यांच्याशी हितगुजही केले. त्यामुळे भाजप प्रवेश करण्याचा दावा होत असलेल्या पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या (NCP) व्यासपीठावरील उपस्थितीने राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. (Abhijit Patil attends Sharad Pawar's program at Kurduwadi)

अभिजित पाटील यांचे कारखाने पंढरपूरमधील घर आणि पतसंस्थेच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने २५ ऑगस्ट रोजी छापेमारी केली होती. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार प्रवीण दरेकर हे तिरंगा रॅलीसाठी पंढरपुरात आले होते. त्यावेळी अभिजित पाटील आणि दरेकर यांची भेट झाली होती. त्यावेळी दरेकर यांनी ‘अभिजित पाटील हे लवकरच भाजपमध्ये येतील’ असा विश्वास व्यक्त केला होता.

Abhijit Patil-Sharad Pawar
Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले

अभिजित पाटील यांचे कारखाने आणि घरांवर पडलेले प्राप्तीकर विभागाचे छापे आणि त्यानंतर दरेकर यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाचा केलेला दावा यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली होती. मात्र, त्यांनी आपले पत्ते ओपन केले नव्हते. पण, आज त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी लावून पुन्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Abhijit Patil-Sharad Pawar
Grampanchyat Election : महाजनांना जळगावमध्येच धक्का : राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गटाचे वर्चस्व; भाजप-काँग्रेसला भोपळा

माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे वडिल विठ्ठलराव शिंदे यांच्या पृर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थितीत होती. त्याच व्यासपीठावर कल्याणराव काळे यांच्या शेजारी अभिजित पाटील बसले होते. माजी सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू असताना पाटील यांनी जागेवरून उठून पवार यांच्याशी संवादही साधला. त्या दोघांमधील संवाद बराच वेळा सुरू होता, त्यामुळे त्यांच्या काय बोलणे झाले असावे, याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

Abhijit Patil-Sharad Pawar
भोरमध्ये राष्ट्रवादीचा थोपटेंना धक्का; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर फडकवला झेंडा

काय म्हणाले होते दरेकर?

पंढरपूरचे अभिजीत पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. ते एक तरूण उद्योजक आहेत. त्यांना साखर कारखाने चालवण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यांच्या पाठीशी मी उभा आहे. मुंबई बॅंकेनेदेखील पाटील यांना मदत केलेली आहे. या चौकशीच्या फेऱ्यातून ते लवकरच बाहेर पडतील, अशी क्लिनचीट देत अभिजीत पाटील लवकरच भाजपमध्ये येतील, असा दावा प्रवीण दरेकर यांनी २९ ऑगस्ट रोजी पंढरपुरात बोलताना केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in